राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले आहेत. तर दुसरीकडे एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक केली आहे. या दोन्ही गोष्टींमुळे राजकीय वातावरण तापले आहे. आता यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
धनंजय मुंडेंवर कारवाई होणार का, हे विचारले असता शरद पवार म्हणाले की, “धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. या संदर्भातील निर्णय पक्ष म्हणून करावा लागले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर हा विषय मांडणार आहे. माझे कर्तव्य आहे की त्यांनी सांगितलेली माहिती या नेत्यांपुढे मांडणे. त्यांची मते जाणून घेत पुढची पावले लवकरात लवकर उचलण्यासंदर्भात निर्णय घेणार आहोत.”
“धनंजय मुंडे यांनी काल मला भेटून आरोपांची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यामधून तक्रारी झाल्या. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली. या प्रकरणावरुन व्यक्तिगत हल्ले होतील याचा अंदाज असावा म्हणून त्यांनी हायकोर्टात अर्ज केला आणि आदेश मिळवला.” असे शरद पवार म्हणाले.
तसेच “या प्रकरणी विलंब व्हावा असं वाटत नाही. कोर्टाचा निर्णय होईल, तपास होईल, पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून तातडीने निर्णय घेऊ,” असे शरद पवार म्हणाले. त्यानंतर शरद पवार यांनी नवाब मलिक यांच्या जावईंना अटक झाली आहे, त्यावरही त्यांनी भाष्य केले आहे.
याबाबत शरद पवार म्हणाले की, “नवाब मलिक हे मंत्रिमंडळातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्यावर वैयक्तिक आरोप झालेले नाहीत. त्यांच्या नातेवाईकावर आरोप झाले असून त्यांना संबंधित यंत्रणेने अटक केली आहे. त्याचा तपास सुरु आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात आरोप नाहीत.”
मरावे परि अवयवरूपी उरावे! २० महिन्यांच्या चिमुकलीने मृत्युनंतरही दिले ५ जणांना जीवनदान
आम्हाला ग्राहकांना डिस्काऊंट द्यायचे होते पण..; डीलर्सच्या खुलाशानंतर मारुती सुझुकीचे पितळ उघडे
धर्मेंद्रच्या दोन्ही मुलांंचे आणि नातवांचे शिक्षण आहे खुपच कमी; वाचून तुम्हाला धक्का बसेल