‘जर आंदोलन चिरडले तर त्याचे परिणाम गंभीर होतील’; शरद पवारांचा मोदी सरकारला थेट इशारा

गेले ६० दिवस पंजाब, हरियाणा आणि वेस्टर्न यूपीतील शेतकरी आंदोलन करत आहेत. पण प्रजासत्ताक दिनादिवशी कृषी कायद्याच्या निषेधार्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली होती. पण शेतकरी परेडदरम्यान संघर्ष उसळला यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी शेतकरी आंदोलनामध्ये झालेल्या गोंधळावर शरद पवार म्हणाले, “कृषी कायद्याविषयीची चर्चा २००३ पासून सुरू आहे. माझ्याकडे कृषी खात्याची जबाबदारी असतानाही ही चर्चा सुरू होती. सर्व राज्यांच्या कृषी व पणन मंत्र्यांच्या बैठकीत आणि माझ्या उपस्थितीत बऱ्याच विषयांवर चर्चा झाली होती. नंतर निवडणुका झाल्या. नवीन सरकार आले आणि हा विषय मागे पडला.”

तसेच “कृषी कायद्याबाबत सविस्तर चर्चा व्हावी अशी आमची भूमिका आहे. सविस्तर चर्चेला मर्यादा असतील तर ही बिले सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्यात यावीत. सिलेक्ट कमिटीमध्ये सविस्तरपणे चर्चा करून निर्णय घेता येईल.” असेही शरद पवार म्हणाले.

तर “बळाचा वापर करून जर आंदोलन चिरडले तर त्याचे परिणाम गंभीर होतील. कारण आपण अशांत पंजाब पाहिला आहे, तसे पुन्हा घडू देण्याचे पातक मोदी सरकारने करू नये.” असा इशारा वजा सल्ला शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे.

शेतकऱ्यांपासून जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी लाल किल्ल्यावरुन मारल्या उड्या, पहा धक्कादायक व्हिडीओ

लाल किल्ल्यावर वादग्रस्त झेंडा फडकवणाऱ्या तरूणाचे भाजप कनेक्शन; भाजपचे पितळ उघडे पडले

खास कॅप्शनसह वरुणने शेअर केले लग्नाचे फोटो; ‘या’ शब्दात केलेय बायकोचे कौतूक..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.