‘उद्या मला मुख्यमंत्री व्हावं वाटेल, कुणी करणार का?’; शरद पवारांचा प्रश्न

शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी शरद पवार यांनी धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे, मराठा आरक्षण, महाविकास आघाडी सरकार, जयंत पाटील यासारख्या विविध मुद्द्यांवर भाष्य केले. जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना शरद पवार यांनी मिश्किल उत्तर दिले आहे.

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यास पत्रकाराने सुरुवात केली. त्यावर ‘मग काय झालं काय?’ असा उलट प्रश्न पवारांनी विचारला. ‘काही संधी आहे का?’ असं विचारत पत्रकाराने आपला प्रश्न पूर्ण केला. तेव्हा ‘उद्या मला वाटलं तर काय करु? मला कोणी करणार नाही, म्हणून मला वाटत नाही’ अशी टिप्पणी शरद पवारांनी केली.

“दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र सध्या आमच्या पक्षाकडे ते पद नाही. प्रथम पक्ष आणि आमदारांची संख्या वाढवावी लागेल. त्यानंतर पक्ष आणि खासदार शरद पवार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल.” असे जयंत पाटील म्हणाले होते.

तसेच धनंजय मुंडे यांच्या बाबत बोलताना “सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निष्कर्षाला येऊ नये, असं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं. आमचा निर्णय बरोबर होता असं आता वाटतंय. त्यामुळं आता जे झालं त्यानुसार आमचा निर्णय योग्य होता.” असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

धनंजय मुंडेवरील आरोप मागे घेणाऱ्या रेणू शर्मावर गुन्हा दाखल करा; भाजपची मागणी

‘या’ कारणामुळे भारतात कोरोना लस घेण्यासाठी घाबरताहेत लोक; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

धनंजय मुंडेंना दिलासा! रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे; दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.