Share

Sharad Pawar : अंधेरी पोटनिवडणूकीत शिवसेनेला पाठींबा देणार का? शरद पवारांनी जाहीर केली भूमिका

sharad pawar

Sharad Pawar : नुकतीच मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुक लवकरच होणार असून त्याची तारीखही समोर आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी आम्ही शिवसेनेला सहकार्य करणार, असे जाहीर केले आहे. तसेच यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यावरही भाष्य केले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दसरा मेळाव्याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, एका पक्षाचे दोन भाग निर्माण झाले आणि त्याच्यात स्पर्धा सुरु झाली. त्यानंतर त्या स्पर्धेचे सूत्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारलं गेलं. मात्र, या गोष्टी होत असतात, संघर्षही होतच असतो पण त्याला काही मर्यादा हवी, असे ते म्हणाले आहेत.

तसेच जर मर्यादा ओलांडून काही होत असेल तर ते राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही. राज्याचे जे जबादार लोक आहेत त्यांनी हे वातावरण दुरुस्त करण्यासाठी पावलं टाकली पाहिजेत, असेही ते यावेळी म्हणाले आहेत. ती पावलं टाकण्याची जबाबदारी आमच्यासारख्या सिनियर लोकांची किंवा त्याहीपेक्षाही राज्याच्या प्रमुखांची ही जबाबदारी अधिक आहे, असेही ते म्हणाले आहेत.

येत्या ३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व पोटनिवडणूक होणार असून ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल तर शिवसेनेकडून ऋतुजा लटके यांचे नाव चर्चेत आहे. यातच राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे याठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. राज्यातील सत्तरानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या
Chandrakant Khaire : आम्ही क्रांती केली म्हणून खैरेंना महत्व आले, यापूर्वी त्यांना मातोश्रीवर प्रवेशही मिळत नव्हता 
Mumbai : आघाडीत बिघाडी! अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत काॅंग्रेस शिवसेने विरोधात उमेदवार उतरवणार
BJP : भाजपचा शिंदेंना दे धक्का! शिवसेनेचा आमदार असलेल्या अंधेरी विधानसभेसाठी भाजपने उमेदवार केला जाहीर
अंधेरी विधानसभेसाठी थेट मातोश्रीवरून सूत्र हलली, ‘या’ उमेदवाराला उतरवलं मैदानात, विरोधकांना फुटला घाम

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now