….म्हणून पुनावाला यांनी सांगूनही शरद पवारांनी स्वतःला लस टोचवून घेण्यास दिला नकार

अहमदनगर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अहमदगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कोरोना लसीबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले सीरमच्या संस्थापकांनी विनंती करुनही मी कोरोना लस घेतली नाही. तसेच त्यांनी यासंबंधीचे कारण सांगितले आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी कोरोनाची लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला शरद पवार यांनी भेट दिली होती. त्याबद्दल बोलताना पवार म्हणाले, आग लागली पण सुदैवाने कोरोनाच्या औषधांना काही झाले नाही.

पुढे ते म्हणाले, सीरमचे संस्थापक माझे चांगले मित्र आहेत. ते काही दिवसांपुर्वी म्हणाले बीसीजीचे इंजक्शन घे त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढेल. आता पुन्हा गेलो होतो तर कोरोना लस घे म्हणाले. मात्र, मी सांगितले आधी नगरला जाऊन येतो तिथली परिस्थिती पाहतो, नंतर वाटल्यास थेट तुझ्याकडे येतो.

यावेळी बोलताना शरद पवारांनी नागरिकांना संसर्गाच्या धोक्याची पुन्हा जाणीव करुन दिली. ते म्हणाले, मोदींच एक वाक्य आहे ‘दो गज की दुरी’ मात्र ते तुम्हीही पाळत नाही आणि मीही पाळत नाही. असं असल तरी काळजी घेण्याची गरज आहे. आता इंग्लडला पुन्हा ३५ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. याची आठवण पवार यांनी करुन दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
अजित पवार गरजले; ‘माझ्या बारामतीत सावकारी चालणार नाही, अन्यथा…’
‘जय श्रीराम’चे नारे दिल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींसमोरच संतापल्या
याला म्हणतात अनुभव! अशोक चव्हाणांनी मोठा घोटाळा शोधून मुख्यमंत्र्यांना वाचवले
पुण्यामध्ये पारंपारिक पद्धतीने सिध्दार्थ आणि मितालीचा विवाहसोहळा पडला पार; बघा लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.