Share

Sharad Pawar : चिन्ह गेल्याने शिवसेनेला फरक पडणार नाही, उलट उद्धव ठाकरे आणखी भक्कम होतील; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

sharad pawar

Sharad Pawar : शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हे सगळं होणार हे आधीच माहीती असल्यामुळे याचं मला आश्चर्य वाटलं नसल्याचे ते म्हणाले आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.

यावेळी शरद पवार म्हणाले की, मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. हे होणार याची मला खात्री होती, असे ते म्हणाले. तसेच एखादी शक्तिशाली संघटना जे चिन्ह ठरवेल ते चिन्ह शेवटपर्यंत टिकेलच असे सांगता येणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे चिन्ह असो अथवा नसो निवडणुकीला सामोरं जायची तयारी केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, मी स्वतः पहिली निवडणूक बैलजोडी या चिन्हाने लढलो. दुसरी निवडणूक गायवासरू, तिसरी चरखा, चौथी पंजा आणि आता घड्याळ या चिन्हाने निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या सगळ्याचा शिवसेनेला फरक पडणार नाही असेही ते म्हणाले.

चिन्ह गेल्याने शिवसेनेला फारसा फरक पडणार नाही. जर अशा प्रकारांनी शिवसेना संपेल असे कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे होईल. उलट उद्धव ठाकरे आणखी भक्कम होतील. शिवसेना आणखी जोमाने वाढेल, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला. महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होईल का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे आणि हे कायम असतील यात काही शंका नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून खरी शिवसेना कोणाची असा वाद सुरु आहे. याबाबत अजूनही निर्णय लागलेला नाही. मात्र, आता अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवले आहे. परंतु, उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशा मागणीची याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. तसेच सोमवारी निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना नवे नाव आणि चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)” आणि शिंदे गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” असे नाव दिले आहे.

महत्वाच्या बातम्या
Sharad pawar : ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या शरद पवारांनी केली भाजप आणि शिंदे गटासोबत युती, समोर आली मोठी माहिती
Uddhav Thackeray : ‘शरद पवारांच्या ‘या’ कुटील डावाला बळी पडून उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा ५० वर्षांचा स्वाभिमान विकला’
Uddhav Thackeray : शरद पवारांचा ‘तो’ सल्ला अखेर उद्धव ठाकरेंनी मानला; निवडणूकीबाबत घेतला मोठा निर्णय
Sharad Pawar : चिन्ह-नाव गमावल्यामुळे शिवसेना संपणार? शरद पवारांनी दिली ‘ही’ मोठी प्रतिक्रिया

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now