ठाकरे सरकारमध्ये पूर्ण उलथापालथीचे संकेत? पवारांचे फक्त तीन वाक्य, अन्…

मुंबई | विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने या पदासाठी पुन्हा होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीला आमदारांची जुळवाजुळव करीत शक्तिप्रदर्शन करावे लागणार आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

याबाबत ते मध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘काँग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्याने अध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष बदलताना काँग्रेसने आमच्याशी चर्चा केली होती. अध्यक्षपद तिन्ही पक्षाचे असल्याने आता ते खुले झाले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष कोण असणार? यावर पुन्हा चर्चा होणार आहे, असे पवारांनी स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे जाणार? याबाबत बोलताना पवारांनी अत्यंत मोजक्याच शब्दात भाष्य केले आहे. पवारांनी अध्यक्षपद खुले झाल्याचे सांगितल्याने राष्ट्रवादीही या पदासाठी दावा करणार असल्याचे स्पष्ट संकेत पवारांकडून मिळत असल्याचे स्पष्ट होतं आहे.

“नाना पटोले यांचा राजीनामा अनपेक्षित नाही; पण..”
पटोले यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रोखठोक भाष्य केले आहे. पवार म्हणाले, ‘किमान समान कार्यक्रमानुसारच निर्णय घेतले जाणार आहे. याबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवणार आहे.

तसेच नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या सत्रानंतर राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, त्यांच्या पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय आहे. त्यांच्या राजीनाम्यावरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. पटोले यांचा राजीनामा अनपेक्षित नाही, गेली काही दिवस यावर चर्चा सुरू होती, असे अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
कुठं कुठं जायाचं हनिमूनला! सिद्धार्थने केला ‘तो’ फोटो शेअर, अन्…
पॉर्न स्टार मिया खलिफा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा फोटो पोस्ट करुन म्हणतीये….
रात्री बाथरूममध्ये घुसून विधवा वहीनीवर दिराने केला बलात्का.र

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.