महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या कामगिरीवर लोकांकडून शिक्कामोर्तब झाला असल्याचे म्हंटले आहे.

तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘धुळे, नंदुरबार निर्णय हा अजिबात आश्चर्यकारक नाही. निर्वाचित होते त्यांच्या हाती मोठा वर्ग पूर्वीपासून होता. त्याचा विजय नव्हे, तो खरा विजय नाही. गेलं वर्षभर आम्ही काम करून दाखवलं आहे. यामध्ये मुख्यतः नागरपूची जागा कधीच मिळाली नव्हती. ती कॉग्रेसने जिंकली. हा महाराष्ट्रातील निकाल महाविकासआघाडीचा विजय असल्याचे ते म्हणाले.

तसेच ‘महाविकासआघाडी सरकारने एकत्र काम केले. त्याचे यश असून पुणे मतदार संघात ही आम्हाला यश मिळवता आलं नव्हते. मात्र आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारले आहे. महाराष्ट्रतील चित्र बदललं असल्याचे पवार म्हणाले.

पुढे पवार म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्षांचा विनोदी वक्तव्य करण्याचा लौकिक आहे. मागच्या वेळेस विधानपरिषदेला चंद्रकांत दादा कसे निवडून आले. गेल्यावेळी आमच्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार होते, त्यामुळे ते निवडून आले. त्यामुळेच पुणे शहरातील त्यांच्या सोयीचा मतदारसंघ निवडला, असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
मराठवाड्यानेही भाजपला डावललं; सतीश चव्हाणांची तिसऱ्यांदा विजयाची हॅटट्रिक
भाजपाच्या गडाला २० वर्षांनी खिंडार; अरुण लाड यांचा विक्रमी मतांनी विजय
पुणे पदवीधरमध्ये भाजपला भगदाड; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी जोरात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.