धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवारांनी केले मोठे विधान, म्हणाले…

मुंबई | बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार महिलेने मागे घेतली आहे.

मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना पवार म्हणतात, ‘रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली, त्याविषयी फारशी माहिती नाही,’ असे पवार म्हणाले.

तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘या संबंधात कागदपत्रं जेव्हा आमच्या हातात आली, तेव्हा खोलात जाण्याची गरज आहे, असा आम्ही निष्कर्ष काढला. त्यामुळे तो बरोबर होता असं म्हणायला लागेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

‘…म्हणून मी धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेते’
धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितले. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिले आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती मिळत आहे.

तक्रारदार महिलेचा यु-टर्न? ‘मी माघार घेते, पण…’
काही दिवसांपूर्वीच तिने ट्वीट करत म्हंटले होते की, ‘तुम्ही सगळ्यांनी निर्णय घ्या, काहीही माहिती नसताना जे मला ओळखत नाहीत आणि जे ओळखतात ते चुकीचा आरोप करत आहेत. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवा, मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे. जर मी चुकीची होती तर हे लोक आतापर्यंत पुढे का आले नाहीत?,’

महत्त्वाच्या बातम्या
‘या’ कारणामुळे भारतात कोरोना लस घेण्यासाठी घाबरताहेत लोक; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती
धनंजय मुंडेंना दिलासा! रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे; दिले ‘हे’ स्पष्टीकरण
अभिजीत बिचकुलेंचे मुख्यमंत्र्यांना थेट मुंबईत जाऊन आव्हान; मुद्दे पाहून खुष व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.