ऑक्सिजन पुरवठ्यासाठी शरद पवार मैदानात; साखर कारखान्यांना दिले ऑक्सिजन निर्मितीचे आदेश

राज्यात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. झपाट्याने वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेचा आभाव निर्माण होत आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण होत आहे. त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारला मदत मागत आहे.

अशा परिस्थिती ऑक्सिजन तुडवड्यावर मार्ग काढण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहे. शरद पवारांनी आता राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या आहे.

राज्यातील १९० कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठ्याच्या सुचना दिल्या आहेत. शरद पवारांच्या निर्देशानुसार हे पत्र महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची प्रमुख संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून राज्यातील कारखान्यांना पाठवण्यात आले आहे.

वसंत दादा इन्स्टिट्युटकडून राज्यातील सहकारी आणि खाजगी अशा १९० कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आवाहन केले आहे. तसेच जे कारखाने बंद आहे, त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करुन रुग्णालयांना पुरवावे असेही, आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली होती. त्यावेळीही कारखान्यांकडून मदत घेण्यात आली होती. गेल्यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात सॅनिटायझरची कमतरता होती. तेव्हा राज्यातील कारखान्यांनी सॅनिटायझर निर्मिती केली होती.

दरम्यान, ऑक्सिजन तुडवड्यामुळे राज्यात रुग्णांची स्थिती गंभीर होत चालली आहे. अशात लवकरच पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्राकडे रवाना होणार आहे. ही ट्रेन उद्या सकाळी नाशिकला पोहचणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

कुंभमेळ्यात सहभागी झाले होते संगीतकार श्रवण अन् त्यानंतरच त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला; मुलाने केला गौप्यस्फोट
कोरोना काळात चोरांचा दिलदारपणा! चिठ्ठी लिहून चोरलेल्या १७०० लसी केल्या परत
राजकुमारला भेटण्यासाठी भितींवरून उडी मारून त्यांच्या घरात घुसला होता सलमान खान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.