महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेतील जागांचे गणित पाहिल्यास भाजप २ जागांवर आपले उमेदवार सहजपणे पाठवू शकतो. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एका जागेवर आपला उमेदवार सहज राज्यसभेवर पाठवू शकतात. (sharad pawar on sambahjirajes maratha reservation)
महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये काही सदस्य अतिरिक्त असल्याने दोघेही ६ जागा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असून उमेदवार उभे करणार आहेत. मात्र विद्यमान राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे.
अशात संभाजीराजे राज्यसभेच्या निवडणूकीसाठी नेमक्या कोणत्या पक्षाचे समर्थन करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ते शिवसेनेत जाणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण याबाबत अजून पूर्णपणे माहिती मिळालेली नाहीये. नेहमी एकमत असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत यावेळी मात्र मतभेद असल्याचे दिसून येत आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संभाजीराजेंना पाठिंबा देणार असे जाहीरपणे म्हटले आहे. तसेच शेवटी महाविकास आघाडी म्हणून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही संभाजीराजेंना पाठिंबा देत त्यांना शिवसेनेकडून ऑफर दिल्याचे म्हटले जात आहे. पण अजूनही कोणाचाही पाठिंबा स्पष्ट झालेला नाही.
तसेच राज्यसभेचा सहावा उमेदवारा हा शिवसेनेचाच असेल असे खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले होते. संभाजीराजे शिवसेनेत आले तरच त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे दिसून येत आहे.
संभाजीराजे यांनी राज्यसभेची सहावी जागा लढवण्याचा निर्णय ज्या दिवशी जाहीर केला, त्याच दिवशी त्यांनी स्वराज्य नावाची संघटना काढण्याचाही निर्णय घेतला होता. आगामी काळात ही संघटना राजकीय पर्याय म्हणूनही उभी राहिल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर गेल्या दोन वर्षात आंदोलनाचे नेतृत्व जवळपास संभाजीराजेच करताना दिसून आले. मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाजातील लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल नाराजी आहे. अशास्थितीत संभाजीराजेंच्या स्वराज्य या संघटनेच्या रुपाने नवा पर्याय उभा राहिला, तर त्याला राज्यात राजकीय पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीराजे राजकीय पटलावर स्वातंत्र्यरित्या आले, तर त्याचा सर्वाधिक राजकीय फटका राज्यात राष्ट्रवादीलाच बसणार आहे. राज्यात विशेष म्हणजे मराठा मतदार हे राष्ट्रवादीचे मुख्य मतदार आहेत. अशास्थितीत संभाजीराजेंनी स्वतंत्र संघटना उभारणे राष्ट्रवादीला परवडणारे नाही. मात्र संभाजीराजे असल्याने खुलेपणानेही याचा विरोध करणे राष्ट्रवादीला शक्य नाही.
महत्वाच्या बातम्या-
‘स्विगी आणि झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांनाही पैसे द्यायची नाही’; केतकीच्या शेजाऱ्यांनी केली तक्रार
सत्तेचा माज! शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी मुंबईतील कुटुंबाला वाळीत टाकले; वाचा नेमकं काय प्रकरण
कंगनाचा धाकड देणार का भूल भुलैयाला टक्कर? काय सांगतात ऍडव्हान्स बुकिंगचे आकडे?