Share

Sharad Pawar on Devendra Fadnavis: कांद्याला किंमत नाही, शेतकऱ्यांचा संसार अडचणीत; देवाभाऊ, शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि बळीराजाकडे ढुंकून पाहत नाही, शरद पवारांचा निशाणा

Sharad Pawar on Devendra Fadnavis: नाशिकमध्ये झालेल्या शेतकरी आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar NCP leader) यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Maharashtra CM) यांच्यावर टीका करत, “कांद्याला भाव नाही, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, संसार डळमळीत झालाय, आणि तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पोस्टरबाजी करता पण बळीराजाकडे ढुंकूनही पाहत नाही,” असे तीव्र शब्दांत हल्ला चढवला.

शेतकऱ्यांचं आयुष्य संकटात – पवारांचा संताप

पवार म्हणाले, “महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, बीडसारख्या भागात दुष्काळी जमीन असूनही पावसाने तडाखा दिला. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि सरकार बघ्याची भूमिका घेतंय. चुकीच्या कृषी धोरणांमुळे आत्महत्यांची मालिका सुरू आहे.”

शिवाजी महाराजांच्या उदाहरणातून टोला

पवारांनी फडणवीसांवर अप्रत्यक्ष टोलाही लगावला. “देवाभाऊ, तुम्ही पोस्टरमध्ये शिवाजी महाराजांचं दर्शन दाखवलंत. पण लक्षात ठेवा, त्यांच्या काळात दुष्काळ पडल्यावर सोन्याचा नांगर देऊन शेतकऱ्यांना मदत केली गेली होती. आज मात्र बळीराजा हाक देतोय तरी तुम्ही मदतीकडे दुर्लक्ष करता,” असं ते म्हणाले.

कर्जमाफीचा अनुभव सांगत केंद्रावर टीका

पवारांनी आठवण करून दिली, “कृषीमंत्री असताना यवतमाळमध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यावेळी मी मनमोहन सिंग यांना विनंती करून स्वतः घटनास्थळी गेलो आणि शेतकऱ्यांच्या दुःखाला स्पर्श केला. फक्त 10 दिवसांत 70 हजार कोटींचं कर्ज आम्ही माफ केलं होतं. पण आजच्या सरकारला शेतकऱ्यांचं अश्रू दिसत नाहीत.”

कांदा निर्यातबंदीवर संताप

नाशिकमधील कांद्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “कांद्याची निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना अडचणीत टाकलं जातंय. शेतकरी आपल्या कांद्याला योग्य भाव मिळावा, त्यातून मुलाचं शिक्षण आणि मुलीचं लग्न व्हावं, एवढीच अपेक्षा करतो. पण आजच्या सत्ताधाऱ्यांना बळीराजाचं दु:ख समजण्याची तयारी नाही,” असा आरोप त्यांनी केला.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now