Share

Sharad Pawar : मुंबई महापालिका निवडणुकीत नवा राजकीय पेच: शरद पवार पुन्हा सूत्रे हलवणार, महाविकास आघाडीत नव्या समीकरणांची चिन्हे

Sharad Pawar : मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस (Congress) पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊन राजकीय चर्चांना वेग आणला असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे दिसू लागले आहे. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे महापालिकेतील सामरिक समीकरणे बदलू शकतात.

मात्र, राज ठाकरे (Raj Thackeray) यांना महाविकास आघाडीत सामील करण्याबाबत काँग्रेसच्या मुंबईतील काही नेत्यांना हरकत असल्याची माहिती आहे. त्यामुळेच काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच स्वतंत्र लढण्याची घोषणा केली होती. पण नुकत्याच घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत तडजोड आणि डॅमेज कंट्रोलची शक्यता निर्माण झाली आहे.

शरद पवारांची सकारात्मक भूमिका

महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांच्या संभाव्य एकजुटीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
मतदार यादीतील घोळाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढताना एकत्र असणारे हे पक्ष मग निवडणूक मात्र वेगळी का लढत आहेत, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केल्याचेही सांगितले जाते.
याशिवाय, मनसेला महाविकास आघाडीत सामील करण्याबाबतही पवारांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

उद्धव ठाकरे यांची भूमिका

सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे म्हणणे आहे की सर्व विरोधकांनी एकत्र आल्यास सर्वांना फायदा होईल, आणि वेगळे पडल्यास दोघांचे नुकसान होईल. विरोधकांची एकसंधता महत्त्वाची असल्याचे ते वारंवार सांगत आहेत.

तसेच, उद्धव ठाकरे हे सध्या काँग्रेसच्या हायकमांडशी संपर्कात असल्याचेही वृत्त समोर आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत या घडामोडींना कोणता वळण मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now