मोठी बातमी! भाजप खासदार उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार

नवी दिल्ली |  राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणूकीपुर्वी रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणारे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. राष्ट्रवादी सोडल्यानंतर उदयनराजे आणि शरद पवार यांच्यात ही पहिलीच भेट आहे.

शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यातील ही भेट दिल्ली येथील शरद पवारांच्या निवासस्थानी होणार आहे. आज (गुरूवारी) संध्याकाळी साडेपाच वाजता ही भेट होईल. या दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

दरम्यान, संसदेच अर्थसंकल्प अधिवेशन सध्या सुरू आहे. शरद पवार आणि उदयनराजे दोघे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे दोघांची सदनामध्ये चर्चा होऊ शकली असती. यामुळे उदयनराजे यांची शरद पवारांच्या निवासस्थानी होणाऱ्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

यापुर्वी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी विधानसभा निवडणुकीपुर्वी खासदारकीचा राजीनामा दिला होता. यानंतर सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शरद पवारांनी घेतलेल्या पावसातील सभेनंतर उदयनराजे यांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
राज्यसभेत पोहोचताच उदयनराजेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले…
भाजपला दणका! अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने राम कदम समर्थकांचा मनसेत प्रवेश
‘पंतप्रधानांनी आत्मचिंतन करावं’; नितीन गडकरींचा ‘तो’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.