परिस्थीती खूप गंभीर, सरकारला सहकार्य करा; शरद पवारांची कळकळीची विनंती

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकार वेगवेगळ्या गाईडलाईन्स आखत आहे, तसेच सत्ताधारी नेत्यांकडून राज्य सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.

राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध आहे, त्यामुळे या निर्बंधांना व्यापारी वर्गाकडून विरोध केला जात आहे,आता या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे.

राज्यातील वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र झटत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. परिस्थितीमुळे राज्य सरकारला नाईलाजाने कठोर निर्बंध लावावे लागले आहे, याला दुसरा पर्याय नाही, केंद्र सरकारचाही हाच सूर असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे.

तसेच कामगार, शेतीकरी, व्यापारी, सर्व सामान्य सर्वांनाच या भयंकर परिस्थितीचा सामना करवा लागत आहे. कित्येकांना आर्थिक झळ बसत आहे, या परिस्थितीला धैर्याने सामोरे गेले पाहिजे, तसेच सध्याची परिस्थिती खूप गंभीर आहे, सरकारला सहकार्य करा, असे आवाहन शरद पवारांनी जनतेला केले आहे.

दरम्यान, केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करण्यासाठी तत्पर आहे, मी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला आहे. केंद्र सरकार पूर्णपणे महाराष्ट्राच्या पाठीशी उभे असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.