Share

केंद्रीय यंत्रणांच्या वापराशिवाय १२५ तासांचे रेकाॅर्डींग शक्य नाही; शरद पवारांनी केली चौकशीची मागणी

Untitled-design-4-1.j

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी काल विधानसभेत एक गौप्यस्फोट केला आहे. विशेष सरकारी वकील आणि काही पोलीस अधिकारी मिळून विरोधी पक्षातील नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. हे आरोप करताना देवेंद्र फडणवीस यांनी पुरावा म्हणून व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला पेनड्राईव्ह देखील विधानसभेत सादर केला होता.(sharad pawar demand inquiry on fadanvis allegation_

या आरोपांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचाही उल्लेख अप्रत्यक्षरित्या करण्यात आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझं अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं, पण माझा यात काहीही संबंध नाही’, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे.

फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर बोलताना शरद पवार म्हणाले की, “आरोपांचा काही भाग समजला. सरकारी अधिकाऱ्यांची १२५ तासांची रेकॉर्डिंग होते ही कौतुकास्पद आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केल्याशिवाय हे शक्य नाही. आरोपांची राज्य सरकारने चौकशी करावी. रेकॉर्डिंगच्या सत्यतेबाबत पडताळणी करणं गरजेचं आहे.”

“अनिल देशमुखांविरोधात ९० छापे टाकण्यात आले. सत्तेचा गैरवापर करून चौकशी केली जाते याचं अनिल देशमुख हे उत्तम उदाहरण आहेत. महाराष्ट्रातील सरकार हातून गेल्यामुळे भाजप अस्वस्थ आहे. त्यामुळे भाजपकडून सत्ताधाऱ्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण सरकारला कुणीही धक्का लावू शकत नाही. हे सरकार पाच वर्ष टिकेल”, असे शरद पवार म्हणाले.

महाविकास आघाडीचे नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचे षडयंत्र रचत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केला होता. यावेळी पुरावा म्ह्णून सुमारे १२५ तासांच्या स्टिंग ऑपरेशनमधील महत्त्वाचे भाग फडवीसांनी २९ वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून सादर केले होते.

भाजप नेते गिरीश महाजनांवर मोक्का लागावा यासाठी राज्य सरकारने सरकारी वकिलांना हाताशी धरुन षडयंत्र रचलं आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “फडणवीसांनी दिलेल्या व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे. ते नटसम्राट आहेत स्टोरी कशी बनवायची ह्यात ते एक्स्पर्ट आहेत.”

महत्वाच्या बातम्या :-
युक्रेनच्या सैन्यात रशियाविरोधात लढणारा भारतीय तरुण आहे तरी कोण? जाणून घ्या…
“देवेंद्र फडणवीसांनी तुमचे कपडे उतरवले, त्यांना कुणीही संपवू शकत नाही”
हॉलिवूडचा डंका! ‘द बॅटमॅन’समोर अमिताभचा ‘झुंड’ मंदावला, वाचा कोणी किती कोटी कमावले..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now