दिल्लीत शरद पवार यांच्या घरी नेत्यांची खलबत, संध्याकाळी १५ मोठ्या नेत्यांची बैठक, चर्चांना उधाण

नवी दिल्ली । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज सायंकाळी एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये १५ प्रमुख नेते सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे या बैठकीकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

आगामी निवडणुकीमध्ये भाजप विरोधात निवडणूक कशी लढवावी, प्रादेशिक पक्षांना यामध्ये कसे स्थान द्यावे, या बैठकीत ही चर्चा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसला या बैठकीपासून दूर ठेवण्यात येणार असल्याची देखील चर्चा आहे. काल शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राजनीतिकार प्रशांत किशोर यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली.

गेल्या आठ दिवसात ही दुसरी भेट असल्याने नक्कीच काहीतरी खलबतं सुरू असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या या बैठकीकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत असे नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक म्हणाले की, आगामी लोकसभेच्या अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाणार आहे.

संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम आजपासून शरद पवार हे करणार असल्याचेही नवाब मलिक म्हणाले. यामुळे आता कोण कोणते नेते यामध्ये सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसला सोडून भाजप विरोधी चौथी आघाडी होईल का यावर देखील चर्चा या बैठकीत केली जाणार आहे.

आगामी अधिवेशनाची रणनीती देखील या बैठकीत ठरवली जाणार आहे. भाजप सरकारला धारेवर धरण्यासाठी ही रणनीती असणार आहे. तसेच अधिवेशनात महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली जाणार आहे. यामुळे ही बैठक महत्त्वाची आहे.

ताज्या बातम्या

….म्हणून काजोलने ‘गदर’सारख्या हिट चित्रपटाला दिला नकार

बाप माणूस! रक्ताचे नाते नसतानाही स्वीकारले १५ अंध मुलांचे पितृत्व, वाचा सविस्तर

नागपूर हादरले! पत्नी, मुलगा, मुलगी, सासूसह मेहुणीची हत्या करत पतीने स्वतःला संपवले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.