हा तर रडीचा डाव; ममतांच्या पराभवानंतर शरद पवार भाजपवर भडकले

देशातल्या निवडणूकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. अंतिम विजय कोणाचा होईल हे अगदी काही तासांत आपल्याला कळणार आहे. हे तर निश्चित आहे की ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विजयावर पाणी फेरले आहे. पण आतापर्यंतच्या निकालासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आतापर्यंतच्या घटनाक्रमाबाबत बोलताना त्यांनी एक ट्वीट केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहीले आहे की बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठिंवा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केले आहे. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता.

पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला रडीचा डाव म्हणता येईल असे ते म्हणाले. कारण काही वेळापुर्वीच ममता बॅनर्जी नंदीग्रामधून विजयी झाल्या आहेत असे वृत्त आधी आले होते. पण त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये निकाल पलटला आणि त्या पराभूत झाल्या आहेत असे वृत्त समोर आले आहे.

याच्यावर बोलताना ममता बॅनर्जी यांनी ट्वीट केले होते की, भाजपाचा पराभव झाला आहे. त्यांनी घाणेरडं राजकारण केलं आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडून खुप त्रास सहन केला आहे. नंदीग्रामबाबत चिंता करून नका आम्ही एक लढा दिल्याने मला तिथे जास्त संघर्ष करावा लागला आहे.

तेथील लोक जे कौल देतील ते मला मान्य आहे. आम्ही २२१ पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत आणि भाजपाचा पराभव झाला आहे, असे ट्वीट त्यांनी केलं आहे. त्यामुळे शरद पवार ममता बॅनर्जींच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.

दरम्यान, नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा विजय झाला आहे की पराभव? यावर चर्चा सुरू असताना तृणमुलने अद्याप मतमोजणी सुरू असून कोणतेही अंदाज व्यक्त करू नका असे आवाहन केले आहे. त्यामुळे नक्की काय होईल यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

महत्वाच्या बातम्या
केसचा निकाल देताना सात महीला व पाच पुरूष न्यायाधीश ढसाढसा रडत होते; असं काय होतं त्या केसमध्ये? वाचा..
मोठी बातमी! क्रिकेटपटू के एल राहूलची प्रकृती बिघडली; उपचारासाठी तातडीने दवाखान्यात हलवले
‘आता दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करा, व्हायरस पसरावयचं थांबवा’
…म्हणून सनी देओल अमिताभला भेटल्यानंतर सर्वात पहीले त्यांच्या पाया पडतो

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.