सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासावरुन शरद पवारांची सीबीआयवर खोचक टीका

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  सीबीआयवर निशाणा साधला आहे.

मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी #CBI मार्फत 2014 मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी सीबीआयवर उपहासात्मक टीका केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा निर्णय दिला आहे. मला खात्री आहे की, महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल, असंही शरद पवारांनी म्हंटल आहे. त्यांनी ट्वीट करत सीबीआयवर निशाणा साधला आहे.

 

दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज 7 वर्षं पूर्ण झाली. पण 7 वर्षांनंतरही सीबीआयसारख्या प्रतिष्ठीत तपास यंत्रणेकडून अजूनही तपास पूर्ण न होणं ही वेदनादायी बाब आहे, असं शरद पवार यांनी एका पत्रकात म्हंटल आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.