शरद पवारांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं! पवारांच्या नावाने १ हजार बेडचे कोविड सेंटर

अहमदनगर । देशभरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आरोग्य विभागावर मोठा ताण आला असून अनेक ठिकाणी बेड देखील उपलब्ध नाहीत. यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. यासाठी आता अनेकजण पुढे येत आहेत.

आता अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या नावाने १ हजार बेडचे कोविड सेंटर दुसऱ्यांदा उभारले आहे. यामुळे आता यामध्ये अनेकांची सोय होणार आहे.

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे हे तब्बल १ हजार १०० खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये शंभर ऑक्सिजन बेड आहेत. विशेष म्हणजे या कोरोना उपचार केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. यासाठी अनेकांनी मदत देखील केली आहे.

यामध्ये निलेश लंके यांनी आवाहन केल्यानंतर १७ लाख रोख रक्कम आणि पाच टन धान्य जमा झाले आहे. यामधील रुग्णांना जेवण, अंडी, वाफेचे मशीन देखील दिली जात आहे. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी देखील आमदार लंके यांनी असेच १००० बेडचे कोविड सेंटर उभारले होते. त्याला देखील शरद पवारांचे नाव दिले होते. यामध्ये देखील सर्व सोय करण्यात आली होती. आमदार लंके यांनी सर्वांना काळजी घेण्याची आवाहनही केले आहे.

राज्यात कोरोनाचा एका दिवसाचा एकदा ६० हजारांपेक्षा पुढे गेला आहे. यामुळे हा आकडा चिंताजनक आहे. अनेक रुग्ण ऑक्सिजन नसल्याने दगावत आहेत. यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.