मुंबई | केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावरून आता देशभरात विरोधक मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणामुळेच शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचं शरद पवार यांनी यापूर्वी म्हणल्याचे, मसनेचे नेते अनिल शिदोरे यांनी म्हणले.
काय म्हणाले शरद पवार..
आपण संपूर्ण देशाची शेती आणि अन्न पुरवठा बघितला, तर सगळ्यात जास्त योगदान त्यात पंजाब व हरयाणातील शेतकऱ्यांचं आहे. यामुळे ज्यावेळी पंजाब व हरयाणातील शेतकरी रस्त्यावर येतो, त्याची फार गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे होती.’
मात्र, दुर्दैवानं ती घेतलेली दिसत नाही. मला स्वतःला असं वाटतं की, हे असंच जर राहिलं, तर ते दिल्लीपुरतं सीमित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला शरद पवार यांनी दिला होता.
यावेळी शरद पवार यांनी कृषी वेधयकाला विरोध केल्यानंतर त्यांच्याच लोक माझे सांगाती पुस्तकातील आठवण त्यांना करुन देण्यात येत आहे. ”राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या “लोक माझे सांगाती” ह्या पुस्तकात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणामुळे कसा अन्याय होतो आहे आणि हे नियंत्रण काढलं पाहिजे असं म्हटलं असल्याचं समजलं. मी पुस्तक वाचलेलं नाही पण हे खरं आहे का?” असा सवाल अनिल शिदोरे यांनी विचारला आहे. शिदोरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनाही यामध्ये टॅग केले आहे.
हो सर मी वाचल आहे…सोबत पुस्तकाचे पान देतो… pic.twitter.com/dZcKA8ILvg
— Ganesh Balasaheb Kore (@GBKore) December 6, 2020
त्यानंतर, एका युजर्संने शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती पुस्तकातील त्या पानाचा फोटोच शेअर केला आहे. तसेच, होय, पवारांनी तसे म्हटले होते. शेतकऱ्यांना जगात कुठेही माल विकता आला पाहिजे, अशीच त्यांची भूमिका होती, असेही त्यात लिहिले आहे.
दरम्यान महाविकास आघाडीने भारत बंदला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेनेही भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. केंद्रातील भाजप सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत लाखो शेतकरी आंदोलन करतनआहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे.