शरद पवारांनंतर आता चंद्रकांत पाटलांचे पुण्यात भरपावसात भाषण! निवडणूक जवळ आल्याने चर्चा सुरू

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची २०१९ मध्ये झालेली सभा देशभरात गाजली. याचे कारण म्हणजे ही सभा भर पावसात झाली होती. या सभेनंतर पवारांना मोठा जनाधार मिळाला होता. यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने चांगले यश संपादन केले होते. आता अशाच एका सभेची पुण्यात चर्चा सुरू आहे.

ही सभा म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची. पुण्यात एका कार्यक्रमातही पाऊस कोसळायला सुरुवात झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी न थांबता भिजत आपले भाषण सुरूच ठेवले. यामुळे अनेकांना पवारांच्या सभेची आठवण झाली.

पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फलक अनावरण कार्यक्रम होता. यावेळी ही घटना घडली. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असतानाच पाऊस कोसळू लागला, मात्र पाटील यांनी न थांबता आपले संबोधन सुरू ठेवले. यामुळे या सभेची चर्चा पुण्यात सुरू आहे.

शहरातील नवी पेठ येथील सेनादत्त पोलीस चौकीच्या समोरील चौकाचं नामकरण आज सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान शरद पवार यांनी पावसात सभा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात जनाधार मिळवला होता. आता पुणे महानगरपालिका निवडणूक देखील तोंडावर आली आहे. आता चंद्रकांत पाटील यांनी पावसात सभा घेतल्याने त्यांना देखील फायदा होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अमेरिकेत देखील निवडणूकीत बायडन यांनी पावसात सभा घेतली होती. आणि ते सत्तेत आल्याने त्यावेळी देखील पवारांच्या सभेची चर्चा सुरू होती. आता पुन्हा एकदा पावसात सभा घेतल्याने चंद्रकांत पाटील चर्चेत आले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.