…त्यामुळे दिल्लीतील शरद पवारांच्या पत्रकारपरिषदेत खोटेपणा उघडा पडला – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले शरद पवार सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेत आहेत.

‘गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव करताना शरद पवार यांच्या तोंडून चुकीची माहिती वदवून घेण्यात आली, असे देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याला योग्यप्रकारे माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे दिल्लीतील पवारांच्या पत्रकारपरिषदेत खोटेपणा उघडा पडला, असे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच फडणवीसांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत नेहमीच्या प्रथेला छेद दिला. “नमस्कार, मी पहिल्यांदा तुमची क्षमा मागतो की आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणं आपण पहिल्यांदा मराठीत प्रेस घेतो. त्यानंतर हिंदीत करतो,’ असे फडणवीस म्हणाले.

‘पण शरद पवारांनीच हा विषय राष्ट्रीय केला असल्यानं आज आपला प्रकार बदलून तमाम मराठी पत्रकारांची आणि माय मराठीची क्षमा मागून आजची पत्रकार परिषद हिंदीत सुरू करणार आहे”, असे फडणवीस म्हणाले. तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

महत्त्वाच्या बातम्या 

डाव पुन्हा पलटला! जप्त केलेली ‘ती’ गाडी फडणवीसांच्या ‘गुडबुक्स’मधल्या बिल्डरची

कृणाल पांड्याची पहील्याच सामन्यात ३१ चेंडूत ५८ धावांची धडाकेबाज खेळी; बापाच्या आठवणीत भर मैदानात रडला..

पदार्पणातच फिफ्टी करणारा कृणाल पांड्या भर मैदानात भाऊ हार्दीकच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.