Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

भारत भालके: भर चौकात शड्डू ठोकून पवारांच्या २५ वर्षापुर्वीच्या अपमानाचा बदला घेणारा पठ्ठ्या

Mayur Sarode by Mayur Sarode
November 28, 2020
in राजकारण, ताज्या बातम्या, राज्य
0
भारत भालके: भर चौकात शड्डू ठोकून पवारांच्या २५ वर्षापुर्वीच्या अपमानाचा बदला घेणारा पठ्ठ्या

पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे आज निधन झाले आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला होता. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार सुरू होते, मात्र अखेर रात्री साडेबाराच्या सुमारात त्यांची प्राणज्योत मावळली आहे. भारत भालके ६० वर्षांचे होते.

भारत भालके हे पंढरपूरचे आमदार होते. भालके पश्चिम महाराष्ट्रातील लोकांशी जोडले गेलेल्या नेत्यांपैकी एक नेते होते. त्यांनी आपल्या जनसंपर्काच्या बळावरच विधिमंडळाच्या सदस्यत्वाची हॅट्रिक मारली होती.

११९२ मध्ये ते राजकारणात सक्रिय झाले होते. २००२ पासून ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहत होते. तेव्हा पासून आजपर्यंत या कारखान्यावर त्यांचेच वर्चस्व राहिलेलं आहे.

भारत भालके हे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत जिंकून आमदार झाले आहे, त्यामुळे त्यांना हॅट्रिक आमदार म्हटले जाते.  विशेष म्हणजे ते तीन वेळा तीन वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढले होते.

२००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, मात्र पुढे ते सलग निवणूक जिंकत गेले. २००९ मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदार संघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांचा पराभव केला होता.

पुढे २०१४ च्या निवडणूकीत त्यांनी काँग्रेस पक्षाला विजय मिळवून दिला. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हातात घेत विजय मिळवला.

साधारणता २५ वर्षांपूर्वी सुधाकर परिचारकांनी शरद पवारांच्या उमेदवाराला पंढरपूरातून पराभूत केलं अन शड्डू ठोकून पवारांना सांगितलं ‘तुमच्या उमेदवाराला पाडून आलोय..’

तेव्हा २५ वर्षानंतर त्याच शरद पवारांच्या शिष्याने म्हणजेच भारत भालके यांनी २०१९ ला परिचारकांना आस्मान दाखवले अन पंढपुरात भर चौकात शड्डू ठोकुन सांगितलं, “शरद पवारांचा पठ्या विजयी झालाय..”

भारत भालके यांनी २०१९ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. आषाढी एकादशीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भालके यांच्या घरी फराळाचा आस्वाद घेतला होता, त्यामुळे चर्चांना चांगलेच उधाण आले होते.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत त्यांनी या चर्चांवर पूर्ण विराम लावला होता. भालके यांच्या निधनाने राजकिय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी भालके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जनसामान्यांचा नेता म्हणून भारत भालके यांची ओळख होती. ते  एक जमिनीशी जुळलेले नेते होते. आता भालके यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी तीन विवाहित मुली आणि एक मुलगा आहे.

Tags: Bharat bhalakelatest marathi articlencpSharad Pawarभारत भालकेमराठी आर्टिकलराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
Previous Post

#coronavirus : ‘या’ नियमांसह राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला

Next Post

गाण्यावरून पत्नीवर होत असलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही संयम बाळगतो, पण…

Next Post
गाण्यावरून पत्नीवर होत असलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही संयम बाळगतो, पण…

गाण्यावरून पत्नीवर होत असलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही संयम बाळगतो, पण...

ताज्या बातम्या

दिल्लीच्या घटनेमागे भाजपचाच हात; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केलेल्या आरोपाने उडाली खळबळ

दिल्लीच्या घटनेमागे भाजपचाच हात; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केलेल्या आरोपाने उडाली खळबळ

January 27, 2021
कृषी कायद्याला विरोधात सेलिब्रिटीही मैदानात; ‘माझ्या बापाला माझा पाठिंबा असणारच’

शेतकरी आंदोलनात फूट! ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर दोन शेतकरी नेत्यांनी घेतली माघार

January 27, 2021
पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का?; निलेश राणेंचा संतप्त सवाल

पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का?; निलेश राणेंचा संतप्त सवाल

January 27, 2021
‘फॅशन’ चित्रपटातील अभिनेत्रीने १४ वर्ष मोठ्या बॉयफ्रेंडसोबत केले बिकनी फोटोशूट; पहा फोटो

‘फॅशन’ चित्रपटातील अभिनेत्रीने १४ वर्ष मोठ्या बॉयफ्रेंडसोबत केले बिकनी फोटोशूट; पहा फोटो

January 27, 2021
अमित शहा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पुढच्या काही तासांत शेतकऱ्यांवर होणार ‘ही’ मोठी कारवाई

अमित शहा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पुढच्या काही तासांत शेतकऱ्यांवर होणार ‘ही’ मोठी कारवाई

January 27, 2021
स्टेट बॅंकेची भन्नाट योजना; एफडी करा व दुप्पट पैसे मिळवा

स्टेट बॅंकेची भन्नाट योजना; एफडी करा व दुप्पट पैसे मिळवा

January 27, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.