राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी पार पडणार आहे. त्यामुळे भाजप आणि विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात येत आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने ममता बॅनर्जी यांनी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. (sharad pawar beacme next president? nana patole give support)
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. शरद पवार जर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, तर काँग्रेस पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे”, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांना पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेत सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले आहे. १५ जूनला दिल्लीत ही बैठक होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांना पत्र देखील लिहिले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षातील २२ प्रमुख नेत्यांना हे पत्र पाठवले आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांसह प्रमुख नेत्यांना हे पत्र पाठवले आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसकडून देखील जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. समविचारी पक्षांशी सल्लामसलत करण्याची जबाबदारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसकडून शरद पवारांना उमेदवारी; बड्या कॉंग्रेस नेत्याने दिले संकेत
“माझ्या एकुलत्या एक मुलाला गोळ्या का घातल्या? त्याचा गुन्हा काय होता?”, आईचा सरकारला संतप्त सवाल
राज्यसभा निवडूणूकीत क्राॅस मतदान केल्यामुळे ‘या’ काॅंग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी






