सावधान! शरद पवारांसंबंधी विकृत लिखान करणारांविरोधात राष्ट्रवादी चवताळली

मुंबई – शरद पवारांसंबंधी विकृत लिखान करणारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राग अनावर झाला आहे. इतके दिवस सुरू असलेल्या ह्या विकृती विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चवताळून उठले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्यावर विकृत आणि आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने, त्यांच्यावर ब्रीज कँडी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, याबाबत सोशल मीडियावर बातमी बाहेर आल्यानंतर काही समाजकंटकानी आजारपणा वर अतिशय हिणकस, आक्षेपार्ह आणि विकृत स्वरूपाचे लिखाण केले.

याविरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महबुब शेख, सूरज चव्हाण आदी उपस्थित होते. त्यानुसार सायबर शाखेने आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांविरोधात कलम 153 अ, 505(2), 500, 504, 469, 499, 507, 35 आय टी अॅक्ट 66(D) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रविकांत वरपे, प्रदेश कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस.
शरद पवार यांचे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. त्यांनी सदैव राजकीय मतभेद बाजूला सारून अनेक पक्षातील मित्र कमावले, तसेच सर्व विचारधारेच्या लोकांना, अनेक घटकांना सोबत घेऊन काम केले आहे. प्रसंगी अनेकांच्या मदतीला धावून आले असल्याचे हा महाराष्ट्र जाणतो.

त्यांच्या आजारपणाच्या काळात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत लिखाण करण्यात आले. महाराष्ट्राची संस्कृती विरोधी विचारांच्या लोकांशीही आदराने वागण्याची शिकवण देते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही कायमच विरोधी पक्षातील नेत्यांना सन्मानाची आणि आदराची वागणूक दिली आहे.

विरोधकांवर राजकीय टीका- टिप्पणी केली. परंतु विरोधकांचे कधीच मरण चीतले नाही. मात्र, विकृत लिखाण करणाऱ्यांमुळे समस्त महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे आक्षपार्ह लिखाण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, जेणेकरून यापुढे असे लिखाण केले जाणार नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.