Share

“कोणत्याही प्रश्नावर महाराष्ट्राच्या मागे उभी असणारी केंद्रातील एकमेव व्यक्ती म्हणजे…” पवारांनी सांगीतलं नाव

sharad pawar

पुण्यातील(Pune) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय साखर परिषदेच्या उदघाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे या साखर परिषदेला हजर होते. (sharad pawar appericate nitin gadakari )

या राज्यस्तरीय साखर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. कोणत्याही प्रश्नावर महाराष्ट्राच्या मागे उभी असणारी केंद्रातील एकमेव व्यक्ती म्हणजे नितीन गडकरी, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्यस्तरीय साखर परिषदेत म्हणाले की, “साखर कारखानदारीसाठी राज्य सरकराची मदत हवीच असते. सुदैवाने आत्ताच्या राज्य सरकारमध्ये उसाबद्दल, कारखानदारीबद्दल जण असणारे अनेक सहकारी आहेत. त्यामुळे त्यांची देखील मदत होईल”, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

शरद पवार राज्यस्तरीय साखर परिषदेत पुढे म्हणाले की, “आज केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील उसाचा, साखरेचा, इथेनॉलचा किंवा कोणताही प्रश्न आला तर एक व्यक्ती भक्कमपणे ऊस उत्पादकांच्या आणि महाराष्ट्राच्या मागे उभी असते आणि त्या व्यक्तीचे नाव नितीन गडकरी आहे. ते आज या ठिकाणी आहेत याचा मला खूप आनंद आहे”, असे शरद पवार यांनी साखर परिषदेत सांगितले आहे.

“सर्वांच्या प्रयत्नाने आपण साखर परिषदेत यश मिळवलं आहे. साखर उद्योगात महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रात प्रगती झाली याचा मला आनंद आहे. पण आता पुढील दिशा शोधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. या अडचणीतून मार्ग काढणं गरजेचं आहे”, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साखर परिषदेत म्हणाले आहेत.

शरद पवार पुढे म्हणाले की, “मागील दोन वर्षात पाऊस चांगला होता. ऊस क्षेत्र वाढलं आहे. हंगाम चांगला झाला आहे. अजून ऊस क्षेत्र वाढणार आहे. हवामान अंदाजानुसार या वर्षी पाऊस चांगला होणार आहे. त्यामुळे आता ऊस क्षेत्र वाढणार आहे आणि त्यासाठी ऊस तोड नियोजन करायला लागणार आहे”, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘अनेक अपक्ष आमदार माझ्या संपर्कात’; आमदार रवी राणांनी उडवली महाविकास आघाडीची झोप
युपीएससी पास झाला, सगळीकडे जल्लोष केला, चॅनेल्सला मुलाखती दिल्या; नंतर समजलं मोठी चूक झालीय…
‘IPL च्या फायनलमध्ये झाली होती मॅचफिक्सींग’, भाजप नेत्याचा जय शहांवर गंभीर आरोप

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now