मोठी बातमी! शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; आॅपरेशन व एन्डोस्कूपी करणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोटात दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली.

पवारांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले. त्यामुळे पवार यांना ३१ मार्चला रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे.

शरद पवारांवर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. शरद पवारांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार १ एप्रिल पासून पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते. पण प्रकृती अस्वस्थेमुळं शरद पवारांना रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याने त्यांचे सर्व नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

शार्दूलला सामनावीर तर भुवनेश्वरला मालिकावीर पुरस्कार का नाही दिला? विराट भडकला

अवैध धंदे १०० टक्के बंद झालेच पाहीजेत, अन्यथा संबंधीत अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करणार

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर संपूर्ण देशात हिंसाचाराच्या घटना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.