धक्कादायक! १०० कोटींच्या प्रकरणात आता शरद पवारांचे नाव; चौकशीसाठी कोर्टात याचिका

 

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा येथी खाडीकिनारी येथे सापडला होता.

त्यामुळे सचिन वाझेंना एनआयएकडून अटक करण्यात आली, त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. त्यानंतर परमबीर सिंगांनी लेटर बॉम्ब टाकून एकच खळबळ उडवली आहे.

या लेटरमध्ये परमबीर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. तसेच अनिल देशमुखांनी सचिन वाझे यांना १०० कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप सुद्धा परमबीर सिंग यांनी केला होता.

तसेच परमबीर यांनी बदलीबाबत आक्षेप घेत, सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यांनंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्युलिओ रिबेरिओ यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. ज्युलिओ यांचे वय आता नव्वदी पार आहे.

त्यामुळे ज्युलिओ नव्वदी पार असले तरी देखील शरद पवारांनी ज्युलिओ यांच्या नेतृत्वाखाली चौकशीची मागणी का केली? ही मागणी करण्यामागचा हेतू काय होता? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.