Share

Sharad Koli : “तानाजी सावंत असो किंवा शहाजी पाटील असो, त्यांना गाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही’’

uddhav thackeray

Sharad Koli : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेतील अनेक आमदार खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे पक्षबांधणीच्या तयारीला लागलेले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येत असून शिवसेनेत इन्कमिंग सुरूच आहे.

काही दिवसांपूर्वी हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे, धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील, आंबेडकरी चळवळीतील मोठं नाव सुषमा अंधारे तसेच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता सोलापूर येथील युवा नेता ‘धाडस’ संघटनेचे संस्थापक शरद कोळी यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई येथील ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी शरद कोळी यांच्या हाताला ठाकरेंनी शिवबंधन बांधले.

शिवसेना पक्ष आज अडचणीत सापडला आहे. अनेक जणांना अनेक पदे देऊन सेनेच्या बंडखोरांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. पण आता वेळ आली आहे ती अडचणीत आलेल्या उद्धव ठाकरेंना साथ देण्याची. म्हणूनच जिथे कमी तिथे आम्ही….” असे म्हणत शरद कोळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

तसेच “माझ्या हजारो कार्यकर्त्यांसह मी आज शिवसेनेत प्रवेश करणार आहे. सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे मोठे काम उभे करेन. असा विश्वास मी उद्धव ठाकरे यांना दिला आहे”, असेही शरद कोळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

‘‘आम्ही कुठल्याही पक्षात नव्हतो, पण शिवसेनेवर काही लोकांनी जे संकट निर्माण केले आहे, त्यामुळे आम्हाला झोप लागत नाही. या संकटाला गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. उद्धवसाहेब तुमच्यासमोर मी एक शब्द देतो, तानाजी सावंत असो किंवा ते शहाजी पाटील त्यांना गाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही,’’ असा इशारा शरद कोळी यांनी दिला.

शिवसेनेची शाखा सोलापूर जिल्ह्यातील गावागावांत काढण्यात येणार असल्याचेही शरद कोळी यावेळी म्हणाले आहे. यासोबतच दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही सरपंच आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी मातोश्रीवर शरद कोळी यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, पंढरपूर विभागाचे उद्धव ठाकरे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक गायकवाड यांच्यासह प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनीसुद्धा बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. ‘‘काहीजण मला विचारतात, उद्धवजी तब्येत कशी आहे. मी त्यांना सांगतो की, पूर्वीपेक्षा सहस्त्रपटीने ताकद वाढलेली आहे. कारण तुम्ही सर्वांनी एक शपथ घेतली आहे. महाराष्ट्राची माती ही मर्दाला जन्म देत असते. मर्दाला जन्म देते आणि गद्दराला गाडते, अशी ही महाराष्ट्राची माती आहे आणि त्या मातेची आणि मातीची आपण लेकरं आहोत,’’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या
शिवसेनेने आमचा विश्वासघात केला, त्याचे परिणाम तो पक्ष भोगतोय… भाजपचा नितीश कुमारांना इशारा
मलईदार खाते तर दूरच, साधे मंत्रीपदही मिळाले नाही; बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी
राष्ट्रवादीत होते तेव्हा बैलगाडीभरून पुरावे देत भ्रष्टाचाराचे आरोप; भाजपमध्ये प्रवेश करताच केलं मंत्री
मोदींकडे ना स्वतः च्या मालकीची गाडी, ना शेअर्स; जाणून घ्या एकूण संपत्ती किती?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now