जून्नरच्या शेतकऱ्याने सुरु केला खेकडा पालनाचा व्यवसाय; १ गुंठ्यात कमतोय महिन्याला लाखो रुपये

शेती व्यवसाय करताना वेगवेगळे प्रयोग करुन बघणे गरजेचे असते, कारण अनेक शेतकरी असे प्रयोग करुन लाखो रुपयांची कमाई करत आहे. त्यातलेच एक नाव म्हणजे शांताराम वारे. जुन्नरमध्ये राहणारे शांताराम वारे यांनी शेतीसोबत खेकडा पालनाचा व्यवसायाही सुरु केला आहे.

सध्या नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामध्ये खेकडे खाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच शांताराम यांनी सहकारी सतिश यांच्यासोबत मिळून खेकडा पालनाचा व्यवसाय सुरु केला आहे.

जून्नर तालुक्यातील मेंगाळवाडी येथे शेती करणारे वारे कुटुंब आधीपासून पारंपारीक शेती करत होते. पण शेतीसोबत एक जोड व्यवसाय असावा अशी इच्छा असल्यामुळे शांताराम यांनी शेतीला जोडून खेकडा पालनाचा व्यवसाय सुरु केला आहे.

त्यांच्याकडे फक्त दिड एकर शेती होती, त्यामुळे काय सुरु करायचं असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यानंतर त्यांनी बाजारातील मागणी पाहून खेकडे पालनाचा व्यवसाय सुरु केला आहे. त्यांनी खेकडा पालनाचा व्यवसाय फक्त १ गुंठाच्या जमिनीवर केला असून महिन्याला यातून ते लाख रुपये कमवतात त्यातून खर्च जाऊन ६० ते ७० हजार रुपयांचा त्यांना नफा होतो.

आता शांताराम वारे यांच्या या खेकडा पालनाला ४ वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाले आहे. खेकड्यांसाठी त्यांनी १ गुंठ्यामध्ये तलाव बांधला आहे. यासाठी साधारण ५० ते ६० हजार रुपये खर्च आला होता. या तलावात असणाऱ्या खेकड्यांना खाण्यासाठी मस्छी मार्केटमध्ये मिळणारे वेस्टेज दिले जाते.

एका मोठ्या पाण्याच्या टाकीतही हा व्यवसाय सुरु केला जाऊ शकतो. यासाठी दर १५ दिवसांनी पाणी बदलावे लागते. विशेष म्हणजे एकदा तलावात खेकडे सोडल्यानंतर पुन्हा नवीन खेकडे आणण्याची गरज पडत नाही, हा व्यवसाय करताना त्यांनी मार्केटींगसाठी व्हॉट्सऍप आणि सोशल मीडियाचाही वापर केला होता.

महत्वाच्या बातम्या-

ब्रिटीशांच्या काळात भारतातील राजे-महाराजे काय करत होते? त्यांनी आवाज का नाही उठवला?
महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा दहशतवाद्यांचा कट फसला; सहा दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात
धर्म कोणता, जात कोणती, त्याचा प्रांत कोणता हे बघून आरोपी ठरवणार का? भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.