नाद खुळा! ३ कोटींचं कर्ज फक्त १७ महिन्यात फेडलं; महिलेने सांगितली पैसे बचतीची भन्नाट आयडिया

सध्याच्या काळात अनेकांच्या डोक्यावर कर्ज असते. कर्जामुळे अनेक लोक निराश असतात, काही लोक आत्महत्यासारखे टोकाचे पाऊलही उचलता, पण आता एका अमेरिकन जोडप्याने काहीच महिन्यात कोट्यावधींचे कर्ज फेडले आहे.

सध्या प्रत्येकाच्या डोक्यावर कोणते ना कोणते कर्ज असते. हे कर्ज फेडणे महागाईच्या काळात खुप कठिण काम आहे. पण एका अमेरिकेतल्या जोडप्याने आपल्या जीवनशैलीमध्ये खास बदल करुन कर्ज कसे कमी केले याबाबत सांगितले आहे.

अमेरिकेची शैनन आणि तिचा पती दोघेही त्यांचे कर्ज फेडण्याच्या मार्गावर आहे. या दोघांनीही कोट्यावधींचे खर्ज फेडण्यासाठी आपल्यी जीवनशैलीत बदल केला आहे आणि आपल्या खर्चात मोठी कपात केली आहे.

शैनन आणि तिच्या पतीवर ४ कोटी ६६ लाख रुपयांचे कर्ज होते. शैनन, तिचा पती आणि त्यांचे संपुर्ण कुटुंब हे कर्ज कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता त्यांचे ४ कोटी ६६ लाखांचे कर्ज फक्त १७ महिन्यात १ कोटी ३२ लाखांपर्यंत आले आहे.

आमचे किराणा बजेट प्रत्येक आठवड्यात ७,३२७ रुपयांच्या आत ठेवण्याची आमची योजना आहे. तसेच कपडे किंवा एखाद्या वस्तु खरेदी करण्यापुर्वी आम्ही नेहमीच मोठ्या ऑफरची वाट बघत असतो, असे शैननने म्हटले आहे.

सर्वात आधी या जोडप्याने ३००० चौरस फुटांऐवजी १००० फुटांचे घर भाड्याने घेतले. ज्यामुळे कुटुंबाची दरमहिन्याला ८६, ४०५ रुपयांची बचत झाली. एवढेच नाही, तर या कुटुंबाने त्यांच्याकडे असलेल्या नवीन कारही विकल्या आणि जुन्या कार खरेदी केल्या आहे. यामुळे त्यांनी एका महिन्यात ५७ हजारांपेक्षा जास्त रुपयांची बचत केली आहे. जीवनशैलीत हा बदल करायला जवळपास ७ महिने लागल्याचे शैननने म्हटले आहे.

काहीच महिन्यांमध्यो तिने आणि तिच्या कुटुंबाने मिळून कोट्यवधींचे कर्ज कमी केले आहे. या संबंधीच्या टीप्सही ती टिक टॉकवर शेअर करत आहे, जेणे करुनही लोकांनाही कर्ज फेडण्यात मदत होईल.

महत्वाच्या बातम्या-

संमथा – नागा चैतन्यच्या घटस्फोटाबाबत मोठा खुलासा; स्वत: संमथानेच ‘ह्या’ कृतीने सत्य समोर आणले
“तुम्ही जेवढे जास्त पैसे कमवता तेवढा इथे तुमचा जास्त आदर, म्हणून आजही इंडस्ट्रीमध्ये तीन खान टॉपला”
राज ठाकरे यांचा ‘तो’ मुद्दा मुख्यमंत्र्यांना पटला! गृहविभागाला दिले तातडीचे आदेश…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.