विजय देवराकोंडाने दिलेला शब्द पाळला, इंडियन आयडलच्या शन्मुखप्रिला लाइगरमध्ये गाणं गाण्याची संधी

साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो, आताही तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने इंडियन आयडल १२ ची फायनलिस्ट शन्मुखप्रिया एक वचन दिले होते. ते वचन त्याने पुर्ण केले आहे.

विजय देवरकोंडाने स्पर्धेच्या वेळी शन्मुखप्रियाला एक संदेश पाठवला होता. या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले होते की, शो जिंकू या नाही. तो तिला हैदराबादमध्ये भेटेल. एवढेच नाही तर विजयने तिला त्याच्या चित्रपटात गाण्याची ऑफर देण्याविषयी बोलले होते.

आता विजयने शन्मुखप्रियाला दिलेले वचन पूर्ण केले. शन्मुखप्रिया हैदराबादला आल्यानंतर ती विजय देवरकोंडाला भेटली आहे. विजयने तिला त्याच्या पॅन इंडियाचा चित्रपट ‘लाइगर’ मध्ये गाणं गाण्याची संधी देखील दिली. यासंबंधित त्याने एक व्हिडिओही शेअर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शन्मुखप्रियाने जगन्नाथ पुरी दिग्दर्शित चित्रपटासाठी एक गाणे रेकॉर्ड केले आहे. या विशेष प्रसंगी विजय देवरकोंडाने शन्मुखप्रियाला त्याच्या घरी बोलावले आणि तिचे खूप कौतुक केले. या वेळी शन्मुखप्रियाची आईही तिथे होती. अभिनेत्याने दिलेल्या वचनाच्या पूर्ततेवर, दोघांनी त्याचे आभार मानले.

विजयने शन्मुखप्रियासोबतचा हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर ‘लाइगर प्रॉमिस’चा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. पुरी जगन्नाथ ‘लाइगर’ चे दिग्दर्शन करत आहेत, ज्याची निर्मिती धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली होत आहे.

करण जोहर, चार्मी कौर, पुरी जगन्नाथ आणि अपूर्व मेहता हे देखील या चित्रपटाचे निर्माते आहेत. विजय आणि अनन्या पांडे व्यतिरिक्त राम्या कृष्णन, विशू रेड्डी, रोनित रॉय, मकरंद देशपांडे, आली आणि गेटअप श्रीनू देखील चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Taarak Mehta! खऱ्याखुऱ्या आयुष्यात ‘बबिता’ला डेट करतोय ‘टप्पू’, रिलेशनशिपमध्ये असल्याची रंगतेय चर्चा
”राज्यसभेवर खैरेंसारख्या मराठी माणसाला डावलून अमराठी चतुर्वेदींना पाठवता आणि बेळगावला पराभव झाला की मराठी अस्मिता दुखावते ?”
भारताने नाकारलेल्या उन्मुक्त चंदची अमेरीकेत तुफानी खेळी; ठोकल्या तब्बल ३०४ धावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.