शंकरपाळ्या! ‘एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई’ व्हिडीओ पाहून लोटपोट व्हाल

मुंबई | दोन लहान मुलांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ते खरोखरीचे भांडण करत ऐकमेकांना धमकावत आहेत. पण पाहणाऱ्यांना ते भांडण खूप मजेशीर वाटते. त्यामधील एका मुलाचा डायलॉग ‘शंकरपाळ्या’ हा खूप चर्चेचा विषय बनला आहे.

व्हिडीओत धक्काबुक्की करत एकमेकांना मारण्याची भाषा दोघ करत आहेत. यातील सर्वात आवडता डायलॉग शंकरपाळ्या हा व्हिडीओच्या शेवटी आहे. त्याच्यातील एक मुलगा जास्त आक्रमक दिसतो. तो समोरुन खूप काही बोलतो, शर्ट खेचतो पण तरीही दुसऱ्या मुलाचा एकच डायलॉग त्याला असतो तो म्हणजे शंकरपाळ्या.

हा व्हिडीओ नेमका कोणत्या भागातील आहे ते अद्याप समजू शकले नाही. परंतु महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील असल्याचे दिसून येत आहे. ज्यामध्ये खेळता-खेळता या दोघांची भांडण लागली असावीत. यात एक मुलगा दुसऱ्याला ‘एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई’ असं म्हणताना दिसतो आहे. हा डायलॉग ऐकल्यानंतर खळखळून हसू येत.

या दोन मुलांच्या भांडणाची स्टाइल लोकांना तुफान आवडली आहे. तसेच व्हिडीओच्या डायलॉगचे मीम्स व्हायरल होत आहेत. शंकरपाळ्या ही नवी शि’वी मार्केटमध्ये आली आहे असचं यावर म्हणता येईल.

महत्वाच्या बातम्या-
‘’मम्मी मेरी शादी करा दो, बच्चा भी पैदा हो जाएगा’’ उतावळा नवरदेव चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल
चिमुकल्याला अशी भोवली मस्ती, पार्श्वभाग अडकला बादलीत; पहा व्हिडीओ
“वार्ड रचना रद्द करून ग्रामपंचायत सदस्य जनतेतून निवडा”; भास्कर पेरे पाटलांची मागणी
राष्ट्रवादीच्या आमदाराने अयोध्येतील राममंदीरासाठी दिली तब्बल १० लाखांची देणगी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.