देवमाणूस! भाड्याच्या गाळ्यात उघडला दवाखाना, आता गरीबांना देतोय फक्त १ रुपयांत उपचार

 

डॉक्टरांना देवाचे दुसरे रुप म्हटले जाते. अनेकदा अशा घटना घटना घडत असतात, जेव्हा अनोळखी माणसाच्या मदतीला डॉक्टर धावून येताना आपण बघतो. आजची गोष्ट तर अशा एका डॉक्टरांची आहे जे रुग्णांना फक्त एक रुपयांत उपचार देत आहे.

ओडीसाच्या संबळपुर जिल्ह्यात राहणाऱ्या या डॉक्टरांचे नाव शंकर रामचंदानी असे आहे. त्यांनी बुरला कस्बे येथे गरीब लोकांच्या उपचारासाठी एक रुपया क्लिनिक सुरु केले आहे. अनेकांना ही गोष्ट खरी वाटणारा नाही पण या दवाखान्यात गरिबांवर फक्त एक रुपयांत उपचार होत आहे.

रामचंदानी हे वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायसेज अँड रिसर्चचे प्राध्यापक आहेत. या डॉक्टरांचे वय फक्त ३८ वर्षे असताना त्यांनी समाजासाठी हे काम करुन एक मोठा आदर्श निर्माण केला आहे.

त्यांना अनेक वर्षांपासून गरीबांची सेवा करण्याची इच्छा होती. ते आधी एक सिनियर रेजीडेंट म्हणून कार्यरत होते. पण ते सिनियर रेजीडेंट असल्याने त्यांना प्रायव्हेट प्रॅक्टिसची परवानगी नव्हती.

आता त्यांची ती ड्युटी संपल्यामुळे त्यांना प्रायव्हेट प्रॅक्टिसची परवानगी मिळाली आणि त्यांनी भाड्याच्या गाळ्यात हे क्लिनिक सुरु केले. ते गरजू आणि गरीब लोकांना फक्त एक रुपयांत उपचार देत आहे.

उपचारासाठी मी गरीब लोकांकडून एक रुपया घेतो. कारण लोकांनी उपचार घेतल्यानंतर त्यांना असे नको वाटायला की उपचार घेतलेत पण पैसे नाही दिले, असे रामचंदानी यांनी म्हटले आहे.

रामचंदानी यांच्या पत्नीचे नाव सिखा रामचंदानी असून त्या सुद्धा एक डॉक्टर आहे. त्यासुद्धा शंकर रामचंदानी यांची हे क्लिनिक चालवण्यास मदत करतात.

दोन आठवड्यांपुर्वीच या क्लिनिकचे उद्धाटन करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी त्यांच्या रुग्णालयात ३३ रुग्ण आले होते. रामचंदानी यांनी आधीपासूनच समाजासाठी काहीना काही करण्याची आवड आहे.

२०१९ मध्ये रामचंदानी यांनी एका कुष्ठरोग्याला कुशीत उचलून घरी सोडले होते, त्यामुळे त्यांचे सर्वत्रच कौतुक केले जात होते. रामचंदानी यांनी आता एक रुपया क्लिनिक सुरु केल्याने ते अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.