एक दिवस त्याला भेटण्याची संधी मिळो…! चिमुकल्याचा आवाज ऐकून शंकर महादेवनही भारावले

मुंबई : सुरेल स्वरांनी रसिकांना मनावर राज्य करणारे सुप्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन हे सध्या एका चिमुकल्याच्या प्रेमात पडले आहेत. महादेवन यांनी नुकताच एका लहान मुलाचा गातानाच व्हिडीओ शेअर केला आहे. एक दिवस त्याला भेटण्याची संधी नक्की मिळो, अशी इच्छाही महादेवन यांनी व्यक्त केली आहे.

या व्हिडीओत एक चिमुकला मुलगा एका मुलीला गाणे शिकवतोय. या मुलाचा आवाज आणि त्याने छेडलेले सूर ऐकून शंकर महादेवनही आवाक झाले आहेत. महादेवन यांनी केवळ या मुलाचा व्हिडीओ शेअर करून याला खास कॅप्शनही दिले आहे.

व्हिडीओ शेअर करताना महादेवन म्हणतात, ‘मी आतापर्यंत पाहिलेला सर्वात गोड आणि सर्वात भारी संगीत शिक्षक. त्याचा आवाज अगदी नैसर्गिक आहे आणि जन्मत:च त्याला हा आवाज गिफ्ट मिळाला आहे. एक दिवस त्याला भेटण्याची संधी नक्की मिळो,अशी आशा करतो,’ असेही त्यांनी लिहिले आहे.

दरम्यान, शंकर महादेवन यांनी तीन तासांपूर्वी हा व्हिडीओ शेअर केला. अवघ्या तीन तासात हा व्हिडीओ ९० हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. महादेवन यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओतील चिमुकला संगीत शिक्षक आहे तरी कोण?याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या
भाजपच्या फ्लॉप सभेचे छायाचित्र व्हायरल; फलकावर सात, स्टेजवर पाच नेते अन् समोर एकच कार्यकर्ता…
शालूचा अदांनी चाहते घायाळ; सोशल मिडीयावर व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
शशांक केतकर बनला ‘बाप’माणूस; बाळाचा फोटो शेअर करत दिली गुड न्यूज…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.