IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सला आलेल्या अपयशाने ‘या’ खेळाडूने घेतला निवृत्तीचा निर्णय

मुंबई | इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या पर्वात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला अपयश आल्याने संघाचा सलामीवीर शेन वॉटसन यानं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेन वॉटसन याच्या निवृत्तीने CSKला आणखी एक धक्का बसला आहे.

१ नोव्हेंबरला रविवारी चेन्नईने आयपीएलच्या १३ व्या मोसमातील शेवटचा सामना पंजाबविरुद्ध खेळला. या सामन्यात चेन्नईने पंजाबवर ९ विकेट्सने मात केली. तसेच ‘शेवटच्या सामन्यानंतर वॉटसन ड्रेसिंगरुममध्ये भावूक झालेला पाहायला मिळाला.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार वॉटसनने सहकाऱ्यांना निवृत्तीचा निर्णय सांगितला आहे. २०१८मध्ये वॉटसनला CSKनं आपल्या टीममध्ये दाखल करून घेतले. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. याचबरोबर २०१८च्या मोसमातील अंतिम सामन्यात वॉटसननं शतकी खेळी करून संघाला जेतेपद पटकावून दिले होते.

दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये वॉटसनने ११ सामन्यांत २९९ धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. IPLमध्ये वॉटसनच्या नावावर १४५ सामन्यांत ३०.९९च्या सरासरीने ३८७४ धावा आहेत आणि त्यात ४ शतकं व २१ अर्धशतकांचा समावेश आहे. शेन वॉटसन याने घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयाने CSKला मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
…तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल; चंद्रकांत पाटलांनी सत्ताधाऱ्यांना केले ओपन चॅलेंज
मी १४ वर्षांची असताना माझ्यावर…; आमिर खानच्या मुलीचा खळबळजनक गौप्यस्फोट
राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी फायनल तयार; उर्मिला मातोंडकरांना डच्चू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.