धक्कादायक! अभिनेत्रीनेच केली सख्य्या भावाची हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन जंगलात फेकले

कन्नड चित्रपटातील अभिनेत्री शनाया काटवेला आपल्या भावाच्या हत्या प्रकरणी हुबळी पोलिसांनी अटक केली आहे. शनायाने तिचा भाऊ राकेश काटवे याची हत्या करुन, तुकडे केले आणि विविध ठिकाणी फेकले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

राकेशच्या हत्या प्रकरणात आणखी चार जणांचा हात आहे. राकेशचे कापलेले डोके देवरागूडीहलाच्या जंगलात सापडले आहे. तर शरीराचे बाकी तुकडे हुबळी आणि गदग रोडवर सापडले आहे.

राकेशच्या हत्या प्रकरणात नियाज काटीगार (२१), तौसिफ चन्नापुरे (२१), अल्ताफ मुल्ला (२४) आणि अमन गिरानीवाले (१९) या चार तरुणांची नावे समोर आली असून यांना अटक करण्यात आली आहे.

राकेशची हत्या ९ एप्रिलला करण्यात आली होती. त्यावेळी शनाया आपल्या आगामी चित्रपटासाठी प्रमोशनसाठी हुबळीला गेली होती. तेव्हा आरोपीने गळा दाबून राकेशची हत्या केली होती.

हत्या केल्यानंतर नियाज आणि अमन यांच्यासोबतच इतरांनी मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाचे कापलेले डोके जंगलात तर उरलेले तुकडे शहरातील वेगवेगळ्या भागात फेकले होते.

या प्रकरणात आता शनायाला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. तसेच तिला न्यायालयीन कोठवडीत पाठवण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचा हुबळी पोलिस आणखी तपास करत आहे.

दरम्यान, शनाया ही कन्नड चित्रपटांची अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनय क्षेत्रातील सुरुवात २०१८ मध्ये केली होती. राघवंका प्रभुद्वारा निर्देशित चित्रपट प्रेमम जीवनम या कन्नड चित्रपटात शनाया पहिल्यांदा दिसून आली होती.

महत्वाच्या बातम्या-

मला अक्षयसारखे मार्केटींग जमत नाही म्हणून मी मागे राहीलो; सुनील शेट्टीने व्यक्त केली खंत
चिन्मय मांडलेकर लिखित ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेने अल्पावधीतच घेतला निरोप; कारण ऐकून थक्क व्हाल
टाटांनंतर आता रिलायन्सही आले मदतीला धावून, मुंबईत ८७५ ICU बेडची करणार सोय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.