Share

चेन्नई सुपर किंग्सच्या धडाकेबाज खेळाडूला दिल्ली कॅपिटल्सने पळवले, धोनीला मोठा धक्का

csk dhoni

इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाच्या मेगा लिलावात सर्व संघांनी आपापल्या खेळाडूंची निवड केली आहे. पुढील महिन्यात आयपीएल सुरू होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील सर्व साखळी सामने महाराष्ट्र्रात खेळवले जाणार आहेत, तर उपांत्य फेरीचे सामने गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये होणार आहेत.(shan watson become delhi capital assitant coach)

आयपीएलच्या मेगा लिलावानंतर सर्व संघ प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षकांची निवड करू लागले आहेत. त्यामुळे बऱ्याच संघांमध्ये खांदेपालट पाहायला मिळणार आहे. यादरम्यान, दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाला एक मोठा धक्का दिला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी खेळाडू शेन वॉटसनचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून समावेश केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉटसनला संघात सामील होण्यास मनवले आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचे दोन माजी खेळाडू एकाच संघात काम करताना दिसणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन पहिल्यांदाच एखाद्या संघासोबत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे.

शेन वॉटसनने आयपीएल कारकिर्दीची सुरुवात राजस्थान रॉयल्स संघाकडून केली होती. शेन वॉटसनने राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व केले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली शेन वॉटसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

शेन वॉटसनला मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या शिफारशीवरून दिल्ली कॅपिटल्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक बनवण्यात येणार आहे. आयपीएलमधील वॉटसनच्या अनुभवाचा देखील दिल्लीला मोठा फायदा होणार आहे. शेन वॉटसनने आयपीएलमध्ये १४५ सामने खेळले असून, त्याने ४ शतकांसह ३८७४ धावा केल्या आहेत. २०२० मध्ये शेन वॉटसनने त्याचा शेवटचा आयपीएल सामना चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळाला होता.

दिल्ली संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी रिकी पाँटिंग यांच्याकडे आहे. गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी जेम्स होप्स सांभाळत आहे. अजित आगरकर आणि शेन वॉटसन आता सहाय्यक प्रशिक्षक म्हणून संघात सामील होणार आहेत. दिल्लीचे कर्णधारपद भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंत यांच्याकडे असणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
लग्नाला एक वर्ष होऊनही पतीने शारिरीक संबंध ठेवण्यास दिला नकार, पत्नीने उचलले धक्कादायक पाऊल
१४ वर्षीय मुलीने लोखंडी तव्याने केली जन्मदात्या आईची हत्या; कारण ऐकून पोलीसही हादरले
‘’भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला…’’

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now