शम्मी कपूर आणि मधूबाला यांच्या मैत्रीतील बियर कनेक्शन माहिती आहे का?

बॉलीवूडमध्ये अनेक मोठे मोठे घराणे आहेत. यात सर्वात मोठे नाव आहे ते म्हणजे कपूर घराण्याचे. कपूर फॅमिली शिवाय ही फिल्म इंडस्ट्री पुर्णच होत नाही.

कपूर फॅमिलीतील अनेक कलाकार या इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. या सर्व कलाकारांची फिल्म इंडस्ट्रीमध्ये खुप चांगली मैत्री आहे. सर्वजण एकमेकांचे खुप चांगले मित्र मैत्रिणी आहेत.

हे सर्व मित्र मैत्रिणी एकमेकांच्या सर्व गोष्टी ऐकतील एवढी चांगली यांची मैत्री आहे. अशाच एका मैत्रीचा किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हा किस्सा आहे बॉलीवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्री मधूबाला आणि शम्मी कपूरचा

मधूबाला बॉलीवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्री आहेत. त्यांनी त्यांच्या सुंदरतेने सर्वांना वेड लावले होते. मधुबाला त्यांच्या काळातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्री होत्या.

चित्रपटांमध्ये मधूबाला यांची जोडी शम्मी कपूरसोबत मोठ्या प्रमाणावर पसंत केली जायची. त्या दोघांच्या जोडीला मोठ्या पडद्यावर खुप प्रसिद्धी मिळाली होती.

मोठ्या पडद्यासोबतच खऱ्या आयुष्यात देखील या दोघांना खुप पसंत केले जायचे. शम्मीजी आणि मधुबाला एकमेकांचे खुप चांगले मित्र होते. ते त्यांच्या प्रत्येक सुख दुःखात एकमेकांसोबत असायचे.

शम्मी कपूर यांचे इंडस्ट्रीत खुप नाव होते. त्यांना बॉलीवूडचे प्रिन्स बोलले जात होते. त्यांचा अभिनय आणि त्यांचा डान्स यामुळे ते खुप प्रसिद्ध होते.

त्यांच्या डान्सचे तर लाखो फॅन्स आजही आहेत. शम्मी कपूर यांना एके दिवशी मधुबाला यांनी एक सल्ला दिला होता. तो ते त्यांनी चांगलाच आमलात आणला होता.

शम्मी कपूर खुप चांगले अभिनेते होते. पण ते खुप बारीक होते. शम्मी कपूर मधूबालासमोर खुप बारीक दिसायचे. त्यामूळे अनेकवेळा त्यांची मस्करी व्हायची.

मधूबाला शम्मी कपूर यांना म्हणाल्या की, तुम्हाला बघून असे वाटतच नाही की तुम्ही माझे हिरो आहात. मला असे वाटतयं की तुम्ही तुमचे वजन वाढवले पाहीजे.

त्यावेळी शम्मी कपूर यांनी मी माझे वजन कसे वाढवू शकतो. असा प्रश्न मधूबाला यांना केला. त्यावर मधूबाला यांनी खुप मजेशीर उत्तर दिले होते.

त्या म्हणाल्या की तसे बघायला गेले तर सामान्य माणसांचे वजन जेवन केल्यानंतर वाढते. पण तुम्ही शम्मी कपूर आहात. मग तुमच्यासाठी काहीतरी वेगळे असायला हवे.

यावर दोघेही हसले. त्यानंतर मधूबाला यांनी बियरचा शरीरावर चांगला परीणाम होतो. मग काय शम्मी कपूर यांनी मधूबाला यांची ही गोष्ट मनावर घेतली.

शम्मी कपूर यांनी बियर पिण्यास सुरुवात केली. त्यांची ही सवय शेवटपर्यंत कायम आहे. या गोष्टीचा खुलासा शम्मी कपूर यांनी स्वत एका मुलाखतीमध्ये केला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.