‘तुमच्या नजरेत चांगला मुलगा असेल तर सांगा’; ४२ वर्षांच्या शमिता शेट्टीची लगीनघाई

शिल्पा शेट्टी बॉलीवूडधले खुप प्रसिद्ध नाव आहे. तर शमिताचा समावेश बॉलीवूडच्या फ्लॉप अभिनेत्रींमध्ये होतो. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज ती चित्रपटांपासून लांब असली तरी नेहमी चर्चेत असते. शिल्पा सध्या टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांमध्ये जज म्हणून काम करत आहे. त्यामूळे ती चांगलीच चर्चेत असते.

तर दुसरीकजे शमिता शेट्टी चित्रपटांपासून दुर राहते. पण ती सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. शमिता शेट्टी आज ४२ वर्षांची झाली आहे. २ फेब्रूवारी १९७९ ला शमिताचा जन्म झाला होता.
तिला लहानपणापासूनच फॅशनची खुप आवड होती. म्हणून तिने फॅशन डिझायनिंगमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. शमिताने फॅशनमध्ये पदवी पुर्ण केली. कॉलेजमध्ये असताना तिला अभिनयात रुची निर्माण झाली.

त्यामूळे तिने बहीण शिल्पाच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. २००० मध्ये रिलीज झालेल्या ‘मोहोब्बते’ चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. हा चित्रपट सुपरहिट झाला.

पण शमिताचे करिअर मात्र फ्लॉप झाले. मोहोब्बते चित्रपटानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. पण तिचे जास्त चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करु शकले नाही. त्यामूळे तिचा समावेश बॉलीवूडच्या अयशस्वी अभिनेत्रींमध्ये होतो.

शमिता ४२ वर्षांची आहे आणि अजूनही ती अविवाहीत आहे. तिच्या लग्नाबद्दल अनेक वेळा प्रश्न विचारले जाते. काही दिवसांपूर्वीच शमिताने एका मुलाखतीमध्ये लग्नाबद्दल खुलासा केला आहे.

शमिता म्हणाली की, मी लग्नासाठी तयार आहे. पण मला माझ्या आवडीचा मुलगा भेटत नाही. त्यामूळे मी सिंगल आहे. मला ज्या दिवशी माझ्या आवडीचा मुलगा भेटेल त्या दिवशी मी लग्न करेन. सध्या तुमच्या जनरेत चांगला मुलगा असेल तर मला सांगा मी नक्की त्या मुलाचा विचार करेन.

शमिताने अनेक हिंदी आणि साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. शमिताचा ‘जहर’ चित्रपट हिट झाला होता. त्यानंतर तिने चित्रपटांच्या स्क्रिप्टकडे व्यवस्थित लक्ष दिले नाही. त्यामूळे तिचे करिअर खराब झाले. त्यानंतर ती अनेक दिवस फिल्म इंडस्ट्रीपासून लाबं होती. सध्या शमिताने वेबसीरीजमध्ये काम करायला सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, वडील मला दारुचे सेवन करायला सांगतात आणि नंतर…

श्रद्धा कपूर अडकणार विवाहबंधनात, बॉयफ्रेंडच्या वडिलांनी दिला दोघांच्या नात्याला पाठींबा

बॉलीवूडची फ्लॉप हिरोईन ते गुगल हेड; वाचा अभिनेत्री मयूरी कांगोचा थक्क करणारा प्रवास

इनकम टॅक्स वाचवण्यासाठी बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वत: ला वेश्या घोषित केले होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.