४२ वर्षांची असूनही अविवाहीत आहे शिल्पा शेट्टीची बहीण शमिता; ‘ह्या’ एका चुकीमूळे करिअर झाले होते खराब

बॉलीवूडमध्ये अनेक बहीण भावांच्या जोड्या काम करतात. त्यातील काही यशस्वी जोड्या आहेत. तर काही फ्लॉप जोड्या आहेत. अनेक बहीणी बहीणी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. अशीच एक जोडी म्हणजे शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी.

शिल्पा शेट्टी बॉलीवूडधले खुप प्रसिद्ध नाव आहे. तर शमिताचा समावेश बॉलीवूडच्या फ्लॉप अभिनेत्रींमध्ये होतो. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज ती चित्रपटांपासून लांब असली तरी नेहमी चर्चेत असते. शिल्पा सध्या टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांमध्ये जज म्हणून काम करत आहे. त्यामूळे ती चांगलीच चर्चेत असते.

शिल्पा शेट्टीप्रमाणेच तिची बहीण शमिता शेट्टीने देखील अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला. पण तिला यश मिळाले नाही. शमिताचा समावेश बॉलीवूडच्या काही फ्लॉप अभिनेत्रींमध्ये होता. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण तिला खास यश मिळाले नाही.

शमिता शेट्टी आज ४२ वर्षांची झाली आहे. २ फेब्रूवारी १९७९ ला शमिताचा जन्म झाला होता. तिला लहानपणापासूनच फॅशनची खुप आवड होती. म्हणून तिने फॅशन डिझायनिंगमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. शमिताने फॅशनमध्ये पदवी पुर्ण केली.

कॉलेजमध्ये असताना तिला अभिनयात रुची निर्माण झाली. त्यामूळे तिने बहीण शिल्पाच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. २००० मध्ये रिलीज झालेल्या ‘मोहोब्बते’ चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. हा चित्रपट सुपरहिट झाला.

पण शमिताचे करिअर मात्र फ्लॉप झाले. मोहोब्बते चित्रपटानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. पण तिचे जास्त चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करु शकले नाही. त्यामूळे तिचा समावेश बॉलीवूडच्या अयशस्वी अभिनेत्रींमध्ये होतो.

शमिताने एका मुलाखतीमध्ये तिच्या करिअरविषयी मोठा खुलासा केला होता. शमिताने करिअरमध्ये अयशस्वी होण्याची कारणे सांगितली होती. ती म्हणाली होती की, ‘मी माझ्या आयूष्यात अनेक चुकीचे निर्णय घेतले होते. त्यामूळे मला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता’.

शमिताने पुढे सांगितले की, ‘मी चित्रपटसृष्टीत आले त्यावेळी मी काहीही विचार केला नव्हता. चित्रपट साईन करताना मी लक्ष दिले नाही. माझ्या चुकीच्या चित्रपटांच्या निवडीमूळे माझे करिअर फ्लॉप झाले. त्यानंतर मला करिअरमध्ये चांगले काम करता आले नाही’.

शमिताने अनेक हिंदी आणि साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. शमिताचा ‘जहर’ चित्रपट हिट झाला होता. त्यानंतर तिने चित्रपटांच्या स्क्रिप्टकडे व्यवस्थित लक्ष दिले नाही. त्यामूळे तिचे करिअर खराब झाले. त्यानंतर ती अनेक दिवस फिल्म इंडस्ट्रीपासून लाबं होती.

सध्या शमिताने वेबसीरीजमध्ये काम करायला सुरुवात केली आहे. ती अनेक वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. शमिताने अजूनही लग्न केले नाही. तिला हवा तसा जीवनसाथी मिळालेला नाही. त्यामूळे ती अजूनही सिंगल आहे. तिने लग्नाचा विचार न करता कामावर लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या –

अमृता सिंगसोबत झालेल्या घटस्फोटाची आठवण काढून रडला सैफ; म्हणाला, माझ्यासाठी सर्वात कठिण…

ऐश्वर्याच्या प्रेमात पागल होता ‘हा’ अभिनेता, सतराव्या मजल्यावरुन उडी मारण्याचा केला प्रयत्न

‘फॅन्ड्री’ चित्रपटातील जब्याचा नवीन लुक पाहून तुम्ही त्याला ओळखू शकणार नाही

‘टाईमपास’ चित्रपटातील साध्या भोळ्या प्राजूचा ग्लॅमरस लुक पाहून तुम्ही थक्क व्हाल; दिसते खुपच हॉट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.