Share

..त्यावेळी काही सैनिकांनी मला चुकीच्या अवस्थेत पाहिलं होतं, करण जोहरने सांगितला लाजिरवाणा किस्सा

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे. तो नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही किस्से शेअर करत असतो. गेल्या काही काळापासून करण जोहर टीव्ही इंडस्ट्रीत खूप सक्रिय झाला आहे. टेलिव्हिजनवरील एका कार्यक्रमात दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे.(Shameful story told by Karan Johar)

करण जोहरने ‘कभी खुशी कभी गम'(Kabhi Khushi Kabhi Gam) हा गाजलेला चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा किस्सा करण जोहरने सांगितला आहे. या चित्रपटातील ‘सूरज हुआ मधम’ या रोमँटिक गाण्याचे शूटिंग सुरु होते. अभिनेत्री काजोल आणि अभिनेता शाहरुख खान यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं.

दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने सांगितले की, “सूरज हुआ मधम गाण्याच्या शूटिंगदरम्यान काजोलने हिरवी साडी नेसलेली होती. त्या ठिकाणी 500 किलोमीटरपर्यंत फक्त चुनखडीच्या मुर्त्या आहेत. इजिप्तमधील फराफ्रा हे मी भेट दिलेल्या जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. त्या ठिकाणी मला लूझ मोशन झालं होतं .”

“एवढ्या सुंदर ठिकाणी माझी वाईट अवस्था झाली होती. त्यावेळी तेथे व्हॅनिटी व्हॅन देखील नव्हती. त्यावेळी मला वॉशरूमला जायचे होते, पण त्या ठिकाणी वॉशरूम सुद्धा नव्हता. अखेर मी एका मोठ्या पुतळ्याच्या मागे जाऊन पोट हलकं केलं. त्या ठिकाणी लपण्यास फार जागा होती. पण त्यावेळी काही सैनिकांनी मला चुकीच्या अवस्थेत पाहिलं”, असे करण जोहरने सांगितले.

निर्माता करण जोहरने सांगितले की, “जेव्हा मी मागे वळून पाहिले. तेव्हा सैन्याचे जवान माझ्या दिशेने येत होते.” हा किस्सा सांगताना निर्माता करण जोहर लाजत होता. ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते.

याशिवाय जया बच्चन, काजोल, करीना कपूर आणि हृतिक रोशनही या चित्रपटात भूमिका केली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली होती. ‘कभी खुशी कभी गम’ हा करण जोहरच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. आजही हा चित्रपट टीव्हीवर आला तर लोक आवर्जून पाहतात.

महत्वाच्या बातम्या :-
‘या’ शुगर स्टॉकमुळे गुंतवणूकदारांचे आयुष्य झाले गोड, वर्षभरात दिला तब्बल ४४० टक्के परतावा
मलिकांची सुटका नाहीच! आता ईडीच्या विरोधातील याचिका फेटाळत कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय
मैं निकला JCB लेके! पंतप्रधान बोरिस जॉन्सन गुजरातमध्ये चढले बुलडोझरवर, पुढं घडलं असं काही..

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now