अन् गृहराज्यमंत्र्यांनी छत्रपती उदयनराजेंना भररस्त्यावरचं घातला मुजरा

सातारा | छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले नेहमीच त्यांच्या बेधडक बोलण्याने चर्चेत असतात. राजकारणात पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. साताऱ्यातील शंभुराज देसाई आणि उदयनराजे भोसले हे वेगवेगळ्या पक्षातील असूनही त्यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे.

शंभुराज देसाई हे उदयनराजे भोसलेंना हायवेवर गाडी थांबवून मुजरा करत असल्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. उदयनराजेंना मुजरा करत त्यांनी राजेंबद्दल मनामध्ये असलेला आदर व्यक्त केला आहे.

उदयनराजे भोसले हे सहकाऱ्यांसोबत गोव्याकडे चालले होते. त्याचवेळी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई कोल्हापुरकडे एका कार्यक्रमाला निघाले होते. शंभुराज देसाई यांच्यासोबत गाड्यांचा मोठा ताफा होता. उदयनराजेंची कार पाहून कोल्हापुरजवळील शिरवळ एमआयडीसी परिसरात शंभुराज देसाईंनी गाड्याचां ताफा थांबवून स्वत: गाडीतून उतरले.

शंभुराज देसाई हे गाडीतून उतरताच त्यांनी उद्यनराजे भोसलेंना मुजरा केला. दोघांनीही रस्त्यावरचं एकमेकांशी संवाद साधला. त्यानंतर दोघेही आपआपल्या दिशेने रवाना झाले.

उदयनराजे भोसलेंना छत्रपती नावाने सन्मान दिला जातो. लहानथोरांसह सर्वजण त्यांना मुजरा घालत असतात. राज्याचे मंत्री असो वा सर्वसामान्य व्यक्ती राजेंना सन्मान देत असतात.

शंभुराज देसाई हे राज्याच्या गृहराज्यमंत्री पदावर आहेत. उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीला रामराम करत ऐन निवडणूकीच्या तोंडावरच भाजपमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादीला धक्का दिला होता.
महत्वाच्या बातम्या-
जळगावात राजकीय भूकंप! भाजपचे २७ नगरसेवक शिवसेनेत; भाजपाचा करेक्ट कार्यक्रम होणार?
संतापजनक! मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या मुस्लिम मुलाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
अंबानींच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या कारचा दहशतवादी संघटनेशी संबंध? NIA ने केला मोठा खुलासा
देवेंद्र फडणवीस ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’ म्हणणाऱ्या गोपीचंद पडळकरांना लोकांनी धु धु धुतले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.