लय भारी! ‘मस्त चाललंय आमचं’, म्हणत शालूच्या डान्सने घातला सोशल मिडीयावर धुमाकूळ; एकदा पहाच..

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या चित्रपटामधील एक चित्रपट म्हणजे ‘फॅन्ड्री’. या चित्रपटात शाळेतील मुलांची लवस्टोरी दाखवण्यात आली होती. त्यातीलच एक प्रचंड गाजलेलं पात्र म्हणजे ‘शालू’ आहे. जब्या आणि शालूची प्रेमकथा सर्वत्र गाजली होती.

फॅन्ड्री मधली शालू म्हणजे राजेश्वरी खरात. राजश्री सोशल मिडीयावर सक्रीय असलेली पाहायला मिळते. खर तर राजेश्वरी चे डायलॉग पाहायला भेटले नसले तरी तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली. तिच्या खऱ्या नावापेक्षा ‘शालू’ नावाने तिची नवीन ओळख निर्माण झाली आहे.

राजेश्वरी सोशल मिडीयावर फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असलेली पाहायला मिळते. तसेच तिचे प्रचंड चाहते आपल्याला पाहायला मिळतात. चाहते तिच्या व्हिडिओला प्रचंड प्रमाणात लाईक करत असतात तसेच अनेकांच्या कमेंटचा वर्षाव झालेला पाहायला मिळतो.

राजेश्वरीने एक नवीन व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊटवर शेअर केलेला पाहायला मिळतोय. या व्हिडीओमध्ये ती ‘मस्त चालंलय आमचं’ या गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळते. डान्समधील तिच्या मुव्ह्ज आणि चेहऱ्यावरील हावभावाने प्रेक्षकांना मोहित केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राजेश्वरी सतत आपले फोटोज आणि व्हिडिओ चाह्त्यांसोबत शेअर करत असते. अनेकदा चाहत्याच्या कमेंटवर ती उत्तर देताना दिसते. चाहते जर तिला ट्रोल करत असतील तर ती अगदी प्रेमाने टोलेबाजी करताना दिसते.

तिचा हा व्हिडिओ शेअर होताच हजारो चाहत्यांनी लाईक केलेलं पाहायला मिळतंय. तसेच अनेकांनी कमेंट करून तिचं कौतुकही केल आहे. राजेश्वरीचा हा दर्जेदार डान्स तुम्हाला नक्कीच आवडेल.

हे ही वाचा-

इंडिअन आयडल १२: सोनू कक्कडला शोची जज म्हणून पाहताच लोक भडकले, म्हणाले संपूर्ण कार्यक्रमातच गडबड

या इलेक्ट्रिक कार्स एकदा चार्ज केल्यावर धावतात ४०० किलोमीटरपेक्षा जास्त, वाचा फीचर्स आणि किंमत

पित्ताची गोळी खाण्याआधी करा हा सोपा घरघुती उपाय; पित्त कायमचे गायब होईल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.