सोनू सूद नावाचा मसिहा आता कुठं गायब झाला?; पुरग्रस्त परिस्थितीवरुन शालिनी ठाकरेंनी सोनू सूदवर साधला निशाणा

राज्यभरात आठवड्याभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण आणि इतर भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पुर येऊन लोकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व भागातून पुरग्रस्तांना मदत पाठवली जात आहे.

आता पुरग्रस्त भागातील परिस्थितीवरुन मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदवर निशाणा साधला आहे. कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या परप्रांतीयांना मागणीनुसार मदत करण्यासाठी अभिनेता सोनू सूद पुढे आला होता, पण आता पुरग्रस्तांसाठी सोनू सुदसह कोणाचाही आवाज ऐकू येत नाही, अशी टीका शालिनी ठाकरे यांनी केली आहे.

कोरोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान ‘मसीहा’चा जन्म झाला होता, पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का..?, असे ट्विट शालिनी ठाकरें यांनी केले आहे.

महाराष्ट्रात आलेल्या पुराच्या संकटाबाबत हिंदी चित्रपटसृष्टी असंवेदनशीलपणे वागत आहे. महाराष्ट्रात इतका मोठा पुर आला आहे, पण चित्रसृष्टीने पुरग्रस्तांना काहीही मदत केलेली नाही, असे म्हणत शालिनी ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

तसेच शालिनी ठाकरे यांनी कोरोना काळातील सोनू सूदच्या मदतीचाही उल्लेख केला होता. बाहेरील राज्यातील लोकांसाठी मदतीला धावणारे बॉलिवूड कलाकार महाराष्ट्राला कठिण काळात मदत करत नाही, असा आरोपीही शालिनी ठाकरे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! जोधा अकबर फेम अभिनेत्याला झाला ‘हा’ गंभीर आजार; जीव वाचवण्यासाठी कापावा लागला पाय
‘आम्ही पॅकेज वाले नाही, असे बोलणाऱ्यांनीच आज पॅकेज जाहीर केले’
बुलेटवर मांडीवर बसून जोडप्याचे चालू होते अश्लील चाळे, गावकऱ्यांनी अडवून चांगलीच जिरवली, पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.