बॉलीवूड कलाकार शक्ती कपूर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरला ड्रग्स घेतल्याप्रकरणी बंगळूरमधून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात काल सिद्धांत कपूरला जामिन मिळाला आहे. सिद्धांत कपूर हा अभिनेता आहे. त्याने बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. (shakti kapoor real name read story)
बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांमध्ये शक्ती कपूरचे नाव घेतले जाते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. तसेच शक्ती कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका देखील केल्या आहेत. प्रत्येक चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाने लोकांची प्रशंसा मिळविणाऱ्या या अभिनेत्याचे खरे नाव शक्ती कपूर नाही.
त्यांचे खरे नाव सुनील सिकंदरलाल कपूर असे आहे. त्यांना ‘शक्ती कपूर’ हे नाव बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्याने दिले होते. सुरवातीला चित्रपटांमध्ये अभिनय करत असताना शक्ती कपूर हे आपल्या मूळ नावाने ओळखले जायचे. पण एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दिग्गज अभिनेते सुनील दत्त यांनी त्यांचे नाव बदलले आणि ‘शक्ती कपूर’ असे ठेवले.
रॉकी चित्रपटात शक्ती कपूर खलनायकाची भूमिका साकारणार होते. या चित्रपटाची शूटिंग सुरु होती. त्यावेळी अभिनेते सुनील दत्त देखील त्या ठिकाणी हजर होते. त्यावेळी खलनायकाचे नाव वेगळे असावे, असे मतं अभिनेते सुनील दत्त यांनी मांडले. त्यानंतर अभिनेते सुनील दत्त यांनी अभिनेते सुनील सिकंदरलाल कपूर यांचे नाव बदलून ‘शक्ती कपूर’ असे ठेवले.
शक्ती कपूर यांनी अभिनेता गोविंदासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गोविंदासोबत असलेल्या चित्रपटांमध्ये शक्ती कपूर यांनी विनोदी भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी राजा बाबू, हंगामा, हसल, मलामाल वीकली, चुप चुपके, बाप नंबरी बेटा दस नंबरी, तोहफा आणि ‘कुली नंबर वन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत.
पण शक्ती कपूर यांना प्रेक्षकांनी खलनायक म्हणूनच जास्त पसंती दिली. शक्ती कपूर यांनी टार्जन द वंडर कार, बुलंदी, लाल बादशाह, गुंडा यांसारख्या चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. शक्ती कपूर यांना ‘राजा बाबू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘ही’ आहे जगातील सर्वात बोल्ड वेबसिरीज; अभिनेत्रीने ओलांडल्यात बोल्डनेसच्या सर्व मर्यादा
अंध भावोजीचा तीन अपंग मित्रांसह मेहुणीवर सामूहिक बलात्कार; ‘असे’ आले प्रकरण उघडकीस
माझ्या मुलाने माझी इच्छा पुर्ण केली, तो चित्रपट क्षेत्रात न येता…; निवेदिता सराफांनी केले मुलाचे कौतूक