Shakti Kapoor : असे म्हणतात प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. प्रेमात सगळे काही माफ असते. आपलं प्रेम मिळवण्यासाठी लोक कोणत्याही टोकाला जात असतात. अनेक वेळेस आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी अनेक कपल पळून जाऊन लग्न करतात. यासाठी अनेक वेळा त्यांना आपल्या आईवडिलांविरुद्ध जावे लागले.(Shakti Kapoor, Shivangi Kolhapure, Gurmeet Chaudhary, Debina Banerjee)
पण तरीही ते कोणत्याही गोष्टीचा प्रेमासाठी अनेकजण का हीही करायला तयार होतात. आपले प्रेम मिळवण्यासाठी अनेक जण पळून जाऊन लग्न करतात. तुम्हाला वाटत असेल फक्त साम्यान लोकच पळून जाऊन लग्न करतात. बॉलीवूडच्या कलाकारांनी देखील प्रेमात पळून जाऊन लग्न केले आहे. त्यांनी प्रेमासाठी सगळे काही सोडून दिले आहे.
जाणून घेऊया अशा कलाकारांबद्दल ज्यांनी पळून जाऊन लग्न केले आहे.
१)आमिर खान आणि रिना दत्ता – आत्ता तुम्ही म्हणाल बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खान का पळून जाऊन लग्न करेल. पण हेच खरे आहे. आमिर खानने त्याची पहिली पत्नी रिनासोबत पळून जाऊन लग्न केले होते. रिना आमिर खानच्या शेजारी राहत होती.
आमिरने रिनाला प्रोपोज केले. रिना हा बोलली होती. पण रिनाच्या घरचे या लग्नसाठी तयार नव्हते. कारण या दोघांचे धर्म वेगळे होते. शेवटी दोघांनी घरातून पळून जाऊन १८ एप्रिल १९८६ रोजी लग्न केले. त्यावेळी आमिरचे वय फक्त २१ वर्ष होते.
२)गुरमीत चौधरी आणि देबिना बेनर्जी – गुरमीत आणि देबिना टेलिव्हिजनवरचे सर्वात प्रसिध्द कपल आहे. १५ फेब्रुवारी २०११ मध्ये या दोघांनी दुसरे लग्न केले होते. कारण या दोघांनी २००६ मध्ये पळून जाऊन लग्न केले होते. पण याबद्दल खुप कमी लोकांना माहिती होते. या गोष्टीचा खुलासा या दोघांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये केला होता.
३)शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापूरे – शक्ती कपूर बॉलीवूडमधल्या सर्वात भयानक खलनायकांपैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने सर्वांना वेडे केले होते. शक्ती कपूर बॉलीवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेच्या बहिणीच्या प्रेमात पडले होते. पण त्यांच्या घरचे लग्नासाठी तयार नव्हते. त्यामूळे त्यांनी पळून जाऊन लग्न केले.
महत्वाच्या बातम्या
ramayana movie : ‘सीता मातेच्या भूमिकेसाठी केवळ हिंदू अभिनेत्री हवी’, करीना कपूर खानला नेटकऱ्यांचा विरोध
Shraddha Kapoor : …त्यामुळे शक्ती कपूर यांनी मुलगी श्रद्धाला फरहानच्या घरातून फरफटत बाहेर काढले होते
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात कांटे की टक्कर; ठाकरे-शिंदेंमध्ये कोणी मारली बाजी? पहा अंतिम निकाल