…त्यामुळे शक्ती कपूर यांनी श्रद्धाला फरहानच्या घरातून फरफटत बाहेर काढले होते

सध्या बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये श्रद्धा कपूरचे नाव सर्वात पहिले येते. श्रद्धाने तिच्या अभिनयाच्या जोरावर सर्वांची मने जिंकली आहेत. त्यासोबतच तिने तिच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले आहे.

श्रद्धा कपूर अभिनेते आणि खलनायक शक्ती कपूर यांची मुलगी आहे. शक्ती कपूर यांनी बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना खलनायक म्हणून खुप जास्त प्रसिद्धी मिळवली होती.

त्यांची मुलगी श्रद्धा कपूरने देखील बॉलीवूडमध्ये खुप लवकर प्रसिद्धी मिळवली आहे. श्रद्धाने बॉलीवूडमध्ये तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आहे. पण अनेक वेळा श्रद्धा कपूर तिच्या अफेअरमूळे देखील खुप जास्त चर्चेत असते.

आज आम्ही तुम्हाला श्रद्धा कपूरचा अशाच एका अफेअरबद्दल सांगणार आहोत. तिच्या या अफेअरमूळे तिच्या घरचे खुप जास्त परेशान झाले होते. कारण श्रद्धा कपूर एका विवाहित माणसाच्या प्रेमात पागल झाली होती.

हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता फरहान अख्तर होता. फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूरने ‘रॉक ऑन 2′ या चित्रपटात एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या शुटिंग वेळी या दोघांमध्ये खुप जास्त जवळीक निर्माण झाली होती.

चित्रपटाच्या सेटवर श्रद्धा आणि फरहान दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारत बसायचे. या दोघांनाही एकमेकांसोबत टाईम घालवायला खुप जास्त आवडत होता. त्या दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिले जाऊ लागले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रद्धा फरहानच्या प्रेमात पागल झाली होती. तिला त्याच्यासोबत लग्न करायचे होते. त्यामूळे श्रद्धाने तिच्या आई वडिलांचे घर सोडले होते. त्यानंतर ती फरहान अख्तरच्या घरी गेली होती. ही गोष्ट शक्ती कपूरला अजिबात आवडली नाही.

त्यामूळे शक्ती कपूर फरहान अख्तरच्या घरी गेले. त्यावेळी शक्ती कपूर आणि फरहान या दोघांमध्येही खुप जास्त वाद झाले होते. शक्ती कपूर यांनी श्रद्धाला तिच्या हाताला धरून फरहानच्या घरातून बाहेर काढले होते.

यामूळे श्रद्धा आणि शक्ती कपूर या दोघांमध्येही खुप जास्त वाद झाले होते. पण शेवटी वडिलांनी श्रद्धाला समजून सांगितले की, फरहान विवाहित आहे. त्यामूळे त्याच्याशी लग्न करणे तुझ्यासाठी योग्य नाही’.

श्रद्धाने शेवटी तिच्या वडिलांची गोष्ट ऐकली आणि फरहानचे घर सोडले. ही गोष्ट त्यावेळी मीडियासाठी खुप मोठी गॉसिप झाली होती. पण शेवटी श्रद्धाला तिची चूक समजली. ती सध्या तिच्या करिअरमध्ये व्यस्त आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी अर्णब गोस्वामींवर केले ‘हे’ गंभीर आरोप; प्रकरण चिघळलं 
 …तर माझा नवरा आज जिवंत असता; अन्वय यांच्या पत्नीचा अर्णब गोस्वामींवर आरोप
‘त्या’ वक्तव्याबद्दल अलका कुबल यांनी मागितली माफी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.