कर्नाटकातील बंगळूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत(Rakesh Tiket) सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी बंगळूरमध्ये राकेश टिकेत यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. (Shaifek on Indian Farmers Union leader Rakesh Tiket)
या प्रकरणात पोलिसांनी तातडीने करावे करत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे बराच गदारोळ निर्माण झाला होता. यावेळी शाई फेक करणाऱ्यांना राकेश टिकेत यांच्या समर्थकांनी मारहाण केली आहे. एका स्टिंग ऑपरेशनशी संबंधित स्पष्टीकरण देण्यासाठी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत आणि युद्धवीर सिंह यांनी बंगळूरमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी राकेश टिकेत आणि युद्धवीर सिंह यांच्यावर काही जणांनी शाईफेक केली आहे. यामुळे पत्रकार परिषदेत गोंधळ निर्माण झाला. या शाई फेक करणाऱ्यांना राकेश टिकेत यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या सर्व घटनेवर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी भाष्य केलं आहे.
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी या प्रकरणावरून कर्नाटक सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. स्थानिक पोलिसांनी आम्हाला कोणतीही सुरक्षा पुरवली नव्हती. हे सर्व सरकारच्या संगनमताने घडले आहे”, असा आरोप भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी केला आहे. सरकारच्या पाठिंब्यानेच ही घटना घडली आहे, असे देखील राकेश टिकेत यांनी सांगितले आहे.
कर्नाटकचे शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांच्यावर पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. एका टीव्ही वाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले होते. या व्हिडिओमध्ये कर्नाटकचे शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर पैशांची मागणी करत असल्याचे दिसत होते. या व्हिडिओसंदर्भात राकेश टिकेत आणि कोडिहल्ली चंद्रशेखर आज पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देत होते. यावेळी शाईफेक करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
लग्नाच्या 30 वर्षांनंतर दोघांतील नात्यावर बोलली अर्चना पूरणसिंह; म्हणाली, वयातील फरकामुळे…
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा मृत्यू झालाय, त्यांच्याजागी सत्तेवर त्यांच्यासारखाच दिसणारा….
‘रोहित पवारांनी आघाडीचा धर्म पाळावा अन्यथा शिवसैनिक…,’ शिवसेना खासदाराने थेट रोहित पवारांना खडसावले